kada,कडा येथे पोलीस स्टेशनला मंजुरी द्या: अनिल ढोबळे यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
kada


आष्टी : प्रतिनिधी
kada,आष्टी तालुक्यातील कडा हे गाव मुख्य बाजारपेठेचे गाव असून या ठिकाणी जवळपास चाळीस गावांचा संपर्क आहे.

तसेच या ठिकाणाहून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने  नेहमीच वाहनांची वर्दळ असते. कडा येथे पोलीस चौकीच असून सुमारे  २४ गावांचा या दुरक्षेत्रात समावेश आहे .

त्यामुळे कडा येथे पोलीस स्टेशनला तात्काळ मंजुरी देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे यांनी शुक्रवारी आष्टी येथे पोलीस अधीक्षक आर राजा वार्षिक  तपासणीसाठी आले असता केली आहे.


शुक्रवारी आष्टी येथे पोलीस अधीक्षक आर राजा वार्षिक  तपासणीसाठी आले असता पोलीस अधिक्षक बीड यांना दिलेल्या निवेदनात ढोबळे यांनी म्हटले आहे की

कडा चौकीतील पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक असल्याचे दिसत नाही.

कड्यात या आधी जेवढ्या चोऱ्या झाल्या त्याचा तपास नाही , आठवडी बाजारातून मोबाईल चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याचा ही छडा लागलेला नाही.

त्यामुळे अलीकडे तर भर दिवसा देखील चोरीच्या घटना घडल्या आहेत.शिवाय कडा येथे दररोज जवळपास चार हजार विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत.

कांदा मार्केट मोठे असल्याने आर्थिक उलढालही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी

पोलीस स्टेशनला मंजुरी द्यावी अशी मागणी अनिल ढोबळे यांनी केली आहे.यासंबधी पोलीस अधीक्षक आर राजा यांनी सांगितले की,कड्यात पोलीस स्टेशन करण्यासाठी लवकरच प्रयत्न करण्यात येतील.

sevadeep award,युवान सामाजिक संस्थेला 5 लाखाचा सेवादीप पुरस्कार

Share this story