*वामनभाऊ महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल*
*वामनभाऊ महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल*

 

 

आष्टी दि 27 जून टीम सीएमन्यूज

महाराष्ट्रातील भाविक भक्ताचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गहीनीनाथगड येथून आषाढी यात्रेनिमित्त संत वामनभाऊ महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला घेऊन जाण्यासाठी सरकारने परवानगी नाकारली आहे.ही परवानगी मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गहिनीनाथगडाचे मठाधिपती ह.भ.प.विठ्ठल महाराज यांनी याचिका दाखल केली असून मंगळवार दि.३० जून रोजी त्यावर निर्णय होणार आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी यंदा सर्वच पालख्या आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे येण्यास शासनाने मज्जाव केला आहे .त्यातच काही मानाच्या पादुकांना बस ने पंढरपूर येथे घेऊन जाण्यासाठी परवानगी दिली आहे. काही दिवसांपूर्वी हेलिकॉप्टरमधून पादुका पंढरपूर येथे नेण्यास परवानगी दिली जाईल असे शासनाने जाहीर केले होते.

मात्र शासनाने ही परवानगी नाकारल्याने विठ्ठल महाराज यांनी खंडपीठात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की,शासनाने हेलिकॉप्टरमधून पादुका पंढरपूर येथे घेऊन जाण्याची परवानगी नाकारल्याने आम्ही पुन्हा याचिका दाखल केली असून त्यावर 30 जून रोजी निर्णय दिला जाणार आहे.
परिसरातील १० जिल्ह्याचे लाखो भाविकांचे गहिनीनाथगड हे श्रद्धास्थान असल्याने हेलिकॉप्टरची परवानगी मिळेल अशी आशा माजी आमदार भीमराव धोंडे यांनी व्यक्त केली.

Share this story