*मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपला दुसऱ्या धक्का;रमेश पोकळे यांची बंडखोरी*
*मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपला दुसऱ्या धक्का;रमेश पोकळे यांची बंडखोरी*

 

औरंगाबाद दि 17 ,प्रतिनिधी

मराठवाडा पदवीधर मतदार संघामध्ये भाजपला आज दुसरा धक्का बसला. भाजपचे कार्यकर्ते आणि पंकजाताईचे खंदे समर्थक असलेले रमेश पोकळे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत पक्षाच्या विरोधात बंड केले आहे.

आपल्याला उमेदवारी दिली नाही यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी पक्षाला रामराम ठोकला नंतर आज उमेदवारी मागे घेण्याची शेवटची मुदत असताना भाजपचे बीडचे कार्यकर्ते रमेश पोकळे यांनी आपला अर्ज कायम ठेवत पुन्हा एकदा भाजपला धक्का दिला आहे.

भाजपचे कार्यकर्ते रमेश पोकळे यांच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीमुळे पुन्हा एकदा भाजपची डोकेदुखी वाढली असून पंकजाताई मुंडे यांचीही डोकेदुखी वाढली आहे. गेल्या अनेक वर्षापासून भाजप रमेश पोकळे यांना मराठवाडा पदवीधर मतदारसंघांमध्ये त्याचबरोबर शिक्षक मतदारसंघांमध्ये ही डावलले असल्याचे त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवले आहे.

हेही वाचा:*भाजपचे जेष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांचा भाजप प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा*

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रमेश पोकळे म्हणाले की मी तीन वाजेपर्यंत दुसऱ्या क्रमांकाची उमेदवारी मला देण्याची मागणी पक्षाकडे करत होतो मात्र पक्षाने आपल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मीही उमेदवारी माझी कायम ठेवत आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा सच्चा कार्यकर्ता असल्याने येत्या निवडणुकीमध्ये आश्चर्यकारक निकाल तुम्हाला पहावयास मिळेल अशी प्रतिक्रिया रमेश पोकळे यांनी व्यक्त केली आहे.

Share this story