जीवनात वाचन व लेखन केल्याने व्यक्तिमत्त्व विकास साधला-आजीनाथ सासवडे
जीवनात वाचन व लेखन केल्याने व्यक्तिमत्त्व विकास साधला   साधला जातो- आजीनाथ सासवडे


कडा 

जीवनात वाचन व लेखन केल्याने  व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो असे  लेखक आजीनाथ सासवडे यांनी सांगितले  ते शुक्रवारी  दादेगाव

 जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत  विध्यार्थी यांना मार्गदर्शन  करताना बोलत होते 

मराठी भाषेचा श्रेष्ठत्व वाढवण्यासाठी अनेक साहित्यिक आपापल्या परीने मराठी भाषेचे नाव आपल्याकडून व्हावे यासाठी प्रयत्न करतात

त्यातीलच एक आष्टी  तालुक्यातील ग्रामीण भागातील लोणी सय्यद मीर येथील व शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सय्यदमीर बाबा

विद्यालयाचे शिक्षक अजिनाथ  सासवडे नवोदित साहित्यकार उदयास  आले असून  आष्टी  तालुक्याची शान आहे त्यांनी ललित लेख

लिहिण्याचे महत्वाचे काम केले आहे त्याचबरोबर आणि अनेक लेखांचं संकलन करून " सुखाचा शोध " या नावाचे पुस्तक प्रकाशित

केले या पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे प्रथम मानांकन देऊन त्यांचा गौरव करण्यात आला असे एक सर्वगुणसंपन्न नवोदित

लेखक जिल्हा प्रशाला दादेगाव या ठिकाणी भेट दिली त्यांचा यथोचित  सत्कार   मुख्याध्यापक  नानासाहेब गायकवाड ,ज्येष्ठ शिक्षक

घुमरे वैजनाथ ,आंधळे बाबासाहेब ,पवार बा म,  मोहन जगताप , घुले अंबादास, महादेव कोकरे , तांदळे गोरक्षनाथ , यांनी  कथाकार

लेखक आजिनाथ सासवडे सरांचा  सपत्नीक सत्कार केला सत्कारास उत्तर देताना आपले " सुखाचा शोध " हे पुस्तक कसे तयार झाले

,विदयार्थी,समाज यांनी सुखाचा शोध कसा घेतला  पाहिजे त्याच प्रमाणे  मोहन जगताप  यांनी त्यांची व आपली भेट कशी झाली यांचे

सहस्य मुलांना सांगीतले त्यांच्या वाचलेल्या कथा मुलांना ऐकवल्या त्याचप्रमाणे पवार बा म यांनी आजची पिढी वाचनीय नाही यातून

त्यांनी म्हटले की जिवनाच्या भवसागरातून  तारावयाचे असेलतर ' वाचन ' महत्वाचे आहे " वाचाल तर वाचाल " बाबासाहेब आंधळे सर

आपल्या मनोगतात बीड जिल्हयातील पहिली लेखिका कवयत्री ' म्हदंबा .अकराव्या शतकाचा इतिहास मांडला त्यापमाणे प्रभारी मुअ

नानासाहेब गायकवाड  यांनी अध्यक्षयी मनोगतात सर्वहित्याचे प्रकार सांगीतले

त्यामध्ये संत, तंत, पंत, त्याच बरोबर संताचे वचन ॥ सुख पाहता जवापाडे ।दुःख मात्र। पर्वताएवढे ॥ नव्हे तर दुःख पाहता जवापाडे ।सुख पर्वता ऐवढे

हे लेखकाने अनेक उदा देवून मुलांना सुख मोठे आहे ,त्याचा शोध घ्या असे मत व्यक्त केले व  आभार मानले  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बा म पवार यांनी

केले त्याचबरोबर नियोजन मोहन जगताप  केले या कार्यक्रमास सुभाष निबांकर शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते

Share this story