उसतोड मजुरांच्या वाहनाला अपघात 2 ठार
उसतोड मजुरांच्या वाहनाला अपघात 2 ठार

परळी

ऊसतोडणीला गेलेल्या उसतोड मजुरांना घेऊन गावाकडे परत निघालेले वाहन

परळी तालुक्यातील सरफराजपूर जवळ पलटी झाले. या अपघातात दोघे जण

जागीच ठार झाले तर अन्य सात जण जखमी झाले. हे सर्व मजूर धारूर 

तालुक्यातील कोयाळ  येथील आहेत.

हा अपघात सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास झाला. सुत्रांच्या माहितीनुसार,

धारूर तालुक्यातील कोयाळ येथील ऊसतोड कामगार सोमवारी सकाळी

ऊसतोडणीसाठी गेले होते. रात्री कोयाळला परत येत असताना सरफराजपूर

नजीक चालकाचे नियंत्रण सुटून त्यांचे चारचाकी

वाहन पलटी झाले. या अपघातात डोक्याला

जबर मार लागल्याने विशाल गौतम वाव्हळे (वय १८) आणि वैजनाथ

रामा वाव्हळे (वय ६५) दोन्ही रा. कोयाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर,

जीपमधील बाळासाहेब कोंडीबा मुंडे (३५),विश्वनाथ बालाजी वाव्हळे (५०),

मेश भगवान मुंडे (३४) सर्व रा. कोयाळ, अरुण नामदेव गायकवाड (६०),

शोभा गायकवाड (५५) दोन्ही वाहन पलटी झाले. या अपघातात डोक्याला

जबर मार लागल्याने विशाल गौतम वाव्हळे (वय१८) आणि वैजनाथ रामा

वाव्हळे (वय ६५) दोन्ही रा. कोयाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर,

जीपमधील बाळासाहेब कोंडीबा मुंडे (३५), विश्वनाथ बालाजी वाव्हळे (५०),

रमेश भगवान मुंडे (३४) सर्व रा. कोयाळ, अरुण नामदेव गायकवाड (६०),

शोभा गायकवाड (५५) दोन्ही रा. तळेगाव, अनिता संजय डोंगरे (४०)

आणि संजय दासू डोंगरे (५०) रा. हिंगणी हे सात जण जखमी झाले.

अपघातानंतर कोयाळ ग्रामस्थांनी जखमींना तातडीने अंबाजोगाईच्या

स्वाराती रुग्णालयात दाखल केले. जखमीपैकी बाळासाहेब मुंडे यांची

प्रकृती चिंताजनक

असल्याने त्यांना लातूरला हलवण्यात आले आहे तर इतरांवर

अंबाजोगाईत उपचार सुरू आहेत.

st bus strike in maharashtra latest news l सुनावणी पुढे ढकलली

Share this story