*सरकारने दुधाला दहा रुपये लिटरप्रमाणे अनुदान द्यावे*
*सरकारने दुधाला दहा रुपये लिटरप्रमाणे अनुदान द्यावे*

 

आष्टी दि 6 जुलै टीमसीएम न्यूज

दुधाला 10 रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज बीड जिल्ह्यातील आष्टी तहसील कार्यालयासमोर सामजिक अंतर ठेवून विठ्ठलाच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून आंदोलन करण्यात आले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर १९ ते २० रूपये भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी वर्ग उध्वस्त होत चालला असून प्रति लिटरला दहा रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे या मागणी साठी राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा सचिव डॉ.शिवाजी शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आष्टी तहसील समोर आंदोलन केले. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते या व्यवसायावरच शेतकरी वर्गाची पूर्ण मदार असून लाखो रुपयांच्या गाई विकत घेतलेल्या आहेत गेल्या तीन महिन्यापासून कोरोनाचे संकट राज्यात आले आणि दुग्ध व्यवसायाला खिळ बसली कोरोनामुळे 34 रुपयावरील दुधाचे भाव थेट 19 ते 20 रुपये पर्यंत नेऊन ठेवले त्यामुळे शेतकरी वर्गाचा मोठा तोटा होत असून फडवणीस सरकारने जसे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला त्यावेळी दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी अनुदान देऊन शेतकरी वर्गांना आधार देण्याचे काम केले होते त्याचप्रमाणे या सरकारने देखील दहा रुपये लिटर प्रमाणे अनुदान देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याची मागणी डॉ.शिवाजी शेंडगे यांनी केली आहे .यावेळी रासपचे तालुकाध्यक्ष गंगा खेडकर,रफिक पठाण सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this story