*कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करत उद्यापासून पासून सकाळी 7.30ते 6.30 वाजेपर्यंत व्यवहार सुरू करता येणार*
*कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करत उद्यापासून पासून सकाळी 7.30ते 6.30 वाजेपर्यंत व्यवहार सुरू करता येणार*

बीड दि 25 मे टीम सीएमन्यूज

केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्यापासून पासून जिल्ह्यातील विविध व्यवहार सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जारी केले आहेत. सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत लागू राहतील .यासाठी कुठलाही पासची आवश्यकता असणार नाही. दारू दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू असणार आहे .तर परवाना धारक व्यक्तीला घरपोच दारू विक्री करता येणार आहे .

जिल्‍ह्यातील कंटेनमेंट झोन आणि बफर झोन वगळता प्रतिबंधीत केलेल्‍या व्‍यवहार/कृती/क्रिया (Activities) व्‍यतिरिक्‍त परवानगी असलेल्‍या सर्व व्‍यवहार/कृती/क्रिया (Activities) साठी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
यामध्ये, सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकत्र येण्‍यास मनाई राहील. वैद्यकिय सेवा, एअर अम्‍बुलन्‍स व सुरक्षा अथवा केंद्रीय गृह मंत्रालयाने अनुमती दिलेल्‍या हवाई प्रवासी वाहतुक व्‍यतिरिक्‍त सर्व प्रकारची देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहील. मेट्रो रेल सेवा, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्‍था/ प्रशिक्षण संस्‍था/ कोचींग क्‍लासेस इत्‍यादी बंद राहतील (तथापी ऑनलाईन /दुरस्‍थः शिकवणी यास परवानगी राहील.)

आरोग्‍य / पोलीस/शासकीय अधिकारी/ आरोग्‍य कर्मचारी, अडकलेले व्‍यक्‍ती, पर्यटक यांच्‍या तात्‍पुरत्‍या निवासासाठी व विलगीकरण सुविधेसाठी आरक्षित केलेले हॉटेल्‍स, रेस्‍टारंट व आदरातिथ्‍य सेवा वगळून इतर सर्व हॉटेल्‍स, रेस्‍टारंट व आदरातिथ्‍य सेवा बंद राहतील. तथापी बस स्‍थानक, रेल्‍वे स्‍टेशन व विमानतळ येथील कॅन्‍टीन सुरु ठेवता येतील. केवळ घरपोच डिलीवरीसाठी रेस्‍टारंटचे किचन सुरु ठेवण्‍यास परवानगी असेल.

सिनेमा हॉल्‍स, शॉपिंग मॉल्‍स, व्‍यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार, पेक्षागृहे, प्रार्थना गृहे तत्‍सम ठिकाणे बंद राहतील. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्‍कृतिक, धार्मिक कार्यक्रम, इत्‍यादीसाठी सार्वजनिकरित्‍या एकत्र येण्‍यास मनाई राहील. सर्व प्रकारचे धार्मिक स्‍थळे/ प्रार्थना स्‍थळे नागरिकांच्‍या प्रवेशासाठी बंद राहतील.

अत्‍यावश्‍यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्‍यक्‍तींच्‍या हालचालींवर/ फिरण्‍यावर संध्‍याकाळी ०७ ते सकाळी ०७ या कालावधीत निर्बंध राहील.  ६५ वर्षांपेक्षा जास्‍त वयोगटातील व्‍यक्‍ती, गर्भवती महिला व १० वर्षा पेक्षा कमी वयाचे मुलांना अत्‍यावश्‍यक
सेवा व वैद्यकिय कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी येण्‍यास मनाई राहील. सर्व नागरिकांना अनावश्‍यकरित्‍या सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणाशिवाय येण्‍यास मनाई राहील.

परवानगी दिलेल्‍या व्‍यवहार/कृती/क्रिया यासाठी कोणत्‍याही शासकीय प्राधिकरणाच्‍या परवानगीची आवश्‍यकता असणार नाही.  क्रीडासंकूले, स्‍टेडियम आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागांना वैयक्तिक व्‍यायामासाठी खुले ठेवण्‍याची परवानगी असेल. तथापी प्रेक्षक वा सामूहिक जमावाला परवानगी असणार नाही.  शारिरीक व्‍यायाम व इतर व्‍यवहार/कृती/क्रिया (Activities) साठी सामाजिक अंतराच्‍या (Social Distancing) निकषांचे पालन करणे बंधनकारक राहील.

सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीस खालील प्रमाणे परवानगी असेल.1) दुचाकी – ०१ स्‍वार,  2) तीन चाकी – १+२
3) चार चाकी – १+२

जिल्‍हांतर्गत बस सेवेस जास्‍तीत-जास्‍त ५० टक्के क्षमतेसह व शारिरीक अंतर आणि स्‍वच्‍छता विषयक उपाययोजनांसह परवानगी असेल.

सर्व बाजारपेठा /दुकाने सकाळी 7.30 ते सायं.6.30 या कालावधीत खुली राहतील. तथापी बाजारपेठा / दुकानांचे ठिकाणी गर्दी आढळल्‍यास व सामाजिक अंतराचे पालन न झाल्‍यास स्‍थानिक प्रशासन त्‍वरीत अशा बाजारपेठा/ दुकाने बंद करण्‍याची कार्यवाही करतील.

सर्व सार्वजनिक ठिकाणी आणि कामाचे ठिकाणी मास्‍क वापरणे अनिवार्य आहे. सार्वजनिक वा कामाचे ठिकाणी थुंकणा-यास संबंधित प्राधिकरणाने कायदेशिर तरतुदींनुसार दंडासह शिक्षा करावी. सर्व व्‍यक्‍तींनी सार्वजनिक ठिकाणी व वाहतुकी दरम्‍यान सामाजिक अंतराचे पालन करावे.
सार्वजनिक ठिकाणी दारु, पान आणि तंबाखू इत्‍यादींचे सेवन करण्‍यास प्रतिबंध राहील. दुकानांचे ठिकाणी ग्राहकांमध्‍ये कमीत कमी ०६ फुट अंतर असेल व ०५ पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना एकत्र येण्‍यास परवानगी असणार नाही.

Share this story