ताज्या घडामोडीमराठवाडा

*वीटेवर उभे करून कोरोना योध्यांना सलाम;महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा उपक्रम*

शेअर करा

 

बीड दि 10 सप्टेंबर, प्रतिनिधी

बीड मध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आयोजित कोरोना योध्याला सलाम हा उपक्रम राबवण्यात आला त्या साठी कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस ,डॉक्टर,पत्रकार,शिक्षक,
सफाई कर्मचारी,होमगार्ड,परिचारिका यांना वीटेवर उभे करून सन्मान करण्यात आला.

कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस ,डॉक्टर,पत्रकार,शिक्षक,
सफाई कर्मचारी,होमगार्ड,परिचारिका यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता मागील पाच महिन्यापासून घरदार सोडून कोरोना सारख्या महामारीला लढा देत आहेत. त्यांचा सन्मान म्हणून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेकडून राज्यभर या पूर्ण युद्धांचा सन्मान करण्याचा उपक्रम राबवत आहे महिला कर्मचाऱ्यांना साडीचोळी देऊन आणि पुरुष यांना शाल श्रीफळ देऊन ढोलीबाजा च्या सलामीने यांचा सन्मान करण्यात आला.अनेक नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने या केलेल्या उपक्रमाचं महाराष्ट्र पोलीस वाइफ संघटनेने कौतुक केले आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल अर्जुनराव दूबाले,योगेश भाऊसाहेब कदम राज्य सचिव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

 

हेही वाचा:बीड जिल्ह्यात 166 नवीन कोरोना बाधितांची भर ;सर्वाधिक रुग्ण माजलगाव येथील 32

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close