ताज्या घडामोडीमराठवाडा

आणि समृद्धी वाघिणीने दिला 5 बछड्यांना जन्म;आतापर्यंत 12

शेअर करा

आणि समृद्धी वाघिणीने दिला 5 बछड्यांना जन्म;आतापर्यंत 12

औरंगाबाद दि 26 डिसेंबर/महेश डागा

ख्रिस्तमस च्या दिवशी औरंगाबादकरांसाठी
आणि प्राणी प्रेमीसाठी खुशखबर मिळाली असून येथील सिद्धार्थ उद्यानातील समृध्दी वाघिणीने 5 बछड्यांना जन्म दिला आहे.

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय येथील सर्वांचे आकर्षण असलेल्या समृद्धी वाघिणीने 5 बछड्यांना जन्म दिला आहे.आतापर्यंत या वाघिणीने 12 बछड्यांना जन्म दिला आहे.

पिवळया रंगाची असलेल्या  वाघीण समृध्दी आणि सिद्धार्थ या दोघांनी या पिलांना जन्म दिला आहे.दि २५.१२.२०२० रोजी पहाटे ०५:०० ते ०६:०० वाजेच्या दरम्यान समृध्दी या वाघीणीने 5 बछडयांना जन्म दिलेला आहे.
या बछड्यांची काळजी वाघीण समृध्दी स्वतः घेत असुन बछडयांना दुध पाजत आहे. वाघिणीच्या व पिलांची पाहणी प्राणिसंग्रहालय पशुवैद्यक याचे मार्फत
करण्यात येत आहे. वाघिणीची  व बछडयांची प्रकृती चांगली आहे. वाघिणीचे
थंडीपासुन संरक्षण होण्याकरिता हिटर लावण्यात आलेले आहे. वाघिणीच्या व
बछड्यांच्या हालचाली माहिती होण्यासाठी सि.सि.टी.व्ही कॅमेरा बसवण्यात आलेला आहे.
वाघिणीच्या व बछड्यांच्या देखभालीसाठी २४ तास केअर टेकर ठेवण्यात आलेले आहेत. वाघिणीच्या पिंजऱ्यात केअरटेकर शिवाय इतर कोणालाही प्रवेश करण्यास परवानगी नाकारण्यात आलेली आहे. या प्रमाणे वाघिणीची व बछडयांची काळजी घेण्यात येत आहे.
यापुर्वी सिध्दार्थ आणि समृध्दी या पिवळे वाघाच्या जोडी पासुन दि.१२.११.२०१६ रोजी 1 नर आणि 2 मादी असे एकुण 3 बछडयांना जन्म दिला होता.तसेच दि.२६.०४.२०१९ रोजी एक नर आणि ३ मादी असे एकुण ४ बछड्यांना जन्म दिला होता व आज दि.२५.१२.२०२० रोजी ५ बछडचांना जन्म दिलेला आहे.

हेही वाचा:अहमदनगर मध्ये इंग्लंडहून प्रवास करून आलेल्या प्रवाशांची संख्या २५

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close