क्राईमताज्या घडामोडी

Sangamner *भाजीपाल्याखाली गोमांस लपवुन वाहतुक;स्थानिक गुन्हे शाखेचा छापा ११०० किलो गोमांस जप्त*

शेअर करा

नगर दि 2 एप्रिल ,टीम सीएमन्यूज

भाजीपाल्याच्या नावाखाली गोमांस घेऊन जात असलेला टेम्पो नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने
नाशिक पुणे महामार्गावर खांडगाव फाट्यावर रंगेहात पकडला .हा टेम्पो संगमनेर शहरातुन पुण्याकडे भाजीपाल्याच्या नावाखाली  गोमांस पुणे येथे घेऊन जात होता .

यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले की,मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा टेम्पो संगमनेर शहरातून पुण्याकडे गोमांस घेऊन जात होता .तो खांडगाव फाट्यावर आल्यानंतर नंबरची खात्री झाल्यानंतर त्यातील भाजीपाला काढण्यास सांगितले.टेम्पो नं.एम एच ०३ सी व्ही ०८४९ मधून सर्व भाजीपाला खाली काढून घेतल्यानंतर खालच्या भागात हा गोवंशीय जनावरांचे मांस आढळून आले .हे मांस इतक्या खुबीने लपविले होते की,सर्व बाजूने फ्लावर त्याबाजूला टोमॅटो कॅरेट लावण्यात आली होती आणि खाली बर्फाच्या लादी मध्ये गोमांस भरण्यात आले होते .अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गोमांस पुण्याला नेऊन विकण्याचा हा प्रयन्त होता .या टेम्पोमध्ये  ११०० किलो गोवंशीय जनावरांचा गोमांस मिळुन आल्याने सदर गोमांस,वाहन असा एकुण ३,८२,००० रुपये किंमती मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला .तसेच दोघांना ताब्यात घेण्यात आले .
संगमनेर शहर पो.स्टे. येथे गुरनं. १६८/२०२०, भा.दं.वि.कलम २६९,३४, महाराष्ट्र पशु संरक्षण अधी.सन १९९५ चे ( सुधारणा ) २०१५ चे कलम ५,(क),९( अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई संगमनेर शहर पो.स्टे. हे करीत आहेत.ही कामगिरी पोना/सचिन अडबल, रविन्द्र कडीले, संतोष लोढे, पोकॉ/ कमलेश पाथरुट,रोहीत मिसाळ यांनी केली .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close