Top-न्यूजताज्या घडामोडी

*सांगवी पाटण सह कन्टेनमेंट झोन,बफर झोन काढून परिस्थिती पूर्ववत–जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

30 जून चा निर्णय कायम

शेअर करा

 

बीड, दि. १ जून ,टीमसीएम न्यूज

सांगवी पाटण गावात १७ मे २०२० रोजी कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आले होते त्यामुळे आष्टी तालुक्यातील काही गावांमध्ये अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१) (३) अन्वये पूर्णवेळ बंद करण्यात येऊन बफर झोन (Buffer Zone) जाहीर झाला व संचारबंदी लागू करण्यात आली होती.
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण गावापासून ३ कि.मी. परिसरातील गावे कन्टेनमेंट झोन तर त्यापुढील ०४ कि.मी. परिसरातील गांवे बफर झोन जाहीर करुन १४ दिवस पूर्ण झालेले आहेत तिथे एकही रुग्ण आढळून आलेला नाही त्यामुळे
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण या गावापासून ३ कि.मी. परिसरातील सांगवी पाटण, खिळद, पाटन, कोहीनी, कारखेलतांडा या परिसरातील कन्टेनमेंट आणि
त्या पुढील ०४ कि.मी. परिसरातील लिंबोडी, धामणगांव, सुर्डी, कारखेल बु., डोईठाण, बावी, लाटेवाडी व महाजनवाडी या गांवातील बफर झोन काढून टाकण्यात येत आहे व परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० या पर्यंत फौजदारी प्रकिया दंड संहिताचे कलम १४४ (१) (३) नुसार मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close