जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानातील 167 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती शनिशिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त अप्पासाहेब शेटे यांनी दिली.
या संदर्भात देवस्थान विश्वस्त समितीची बैठक झाली या बैठकीमध्ये त्यांनी या कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन आणि अनुपस्थिती या कारणामुळे या 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यामध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात मुस्लिम कर्मचाऱ्यांना शनिशिंगणापूर देवस्थान येथे नोकरी देऊ नये याबाबत हिंदू संघटनांनी उद्या शनिशिंगणापूर येथे आंदोलनाची हाक दिली आहे.
या पार्श्वभूमीवर देवस्थाने हा निर्णय घेतला आहे तसेच हे आंदोलन न करता सामोपचाराने निर्णय घ्यावा असेही शेटे यांनी सांगितले.