आरोग्यताज्या घडामोडी

*शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह :आरोग्यमंत्री राजेश टोपे*

शेअर करा

पारनेर दि 17 ,प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे तीन अंगरक्षक कोरोना बाधित झाले असून शरद पवार हे तंदुरुस्त आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली .
अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर- कर्जुले हद्दीवर असणारा मातोश्री शैक्षणिक संकुलाच्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात शरद पवार यांच्या नावाने १ हजार बेडचे कोव्हिड सेंटर उभारण्यात आले असुन याचा लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली . यावेळी आ.निलेश लंके,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,सभापती प्रशांत गायकवाड, बापुसाहेब शिर्के,राहुल झावरे शरद झावरे आदी उपस्थित होते.

 

हेही वाचा:*हजार बेडच्या कोविड सेंटरचा लोकार्पण;सुप्यात लवकरच उभारणार ट्रामा सेंटर:आरोग्यमंत्री राजेश टोपे*

पवार याच्या सहा अंगरक्षकापैकी तीन जण बाधित झाले आहेत.त्यांच्या कुटुंबातील दोन जण बाधित झाले असून त्यांची सर्व काळजी घेतली जात आहे. शरद पवार यांची टेस्ट निगेटिव्ह आली असून ते तंदुरुस्त असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close