क्राईमताज्या घडामोडी

*शेवगावच्या त्या 26 टन हरभऱ्याची चौकशी सुरू;नाफेडच्या अधिकाऱ्याने नोंदविले जवाब*

शेअर करा

 

शेवगाव दि ,12 मे टीम सीएमन्यूज

टाळे बंदीच्या काळात शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी शासनाने नाफेडची खरेदी केंद्र सुरू केली. मात्र या खरेदी केंद्रांवर व्यापाऱ्यांचा माल विकत घेतला जात असताना शेवगाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले होते .या प्रकरणाची नाफेडच्या उच्च अधिकाऱ्यांनी येऊन चौकशी केली .त्यांनी तक्रारदार, व्यापारी खरेदी केंद्राचे चालक यांचे साक्ष नोंदवून घेतल्या .याचा अहवाल तयार करून कार्यालयाला सादर केला जाणार असल्याचे नाफेडचे अधिकारी रमेश ठोकरे यांनी सांगितले.

तोपर्यंत या हरभऱ्याच्या गाड्या इथेच राहणार आहेत .हा हरबरा कुठून, कसा आला आणि कोणी नोंद करण्यास सांगितले याचे तपशीलवार नोंदी या अधिकाऱ्यांना या जबाबातून मिळाल्या आहेत.
टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून शासनाने नाफेड मार्फत अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे शेतकऱ्यांचा हरबरा खरेदी केंद्र सुरू केले.मात्र त्याचा गैरफायदा व्यापारी घेत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उघडकीस आणले आहे .या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथून दोन ट्रक मध्ये भरून आणलेला 26 टन हरबरा या केंद्रात विकताना रंगेहात पकडले .शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत भराट यांनी तहसीलदार आणि नाफेडच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले .मात्र अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही,उलट ह्या ट्रक केंद्राच्या बाजूला उभा करण्यात आल्या आहेत .
कळंब जिल्हा उस्मानाबाद येथील हनुमंत संभाजी राखुडे या व्यापाऱ्याने 26 टन हरभरा नगर येथील व्यापारी मोहनदास लोढा यांना विकला होता मात्र थेट शेवगावच्या जगदंबा महिला सहकारी संस्था संचलित नाफेड खरेदी केंद्रावर आला.हा हरबरा थेट वजन करून खरेदी केंद्रात उतरविला जात होता ,संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडला .
या बाबत काय कारवाई करायची आणि कोणी करायची यामध्ये या गाड्या शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आहेत .यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठपुरावा केल्याने आता याची चौकशी सुरू झाली आहे .आता प्रतीक्षा आहे ती कारवाईची .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close