आरोग्यताज्या घडामोडी

Shirdi-corona- *शिर्डी  परिक्रमा आयोजकांवर शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल*

शेअर करा

शिर्डी दि .15, टीम सीएमन्यूज

शिर्डी शहरामध्ये रोजी शिर्डी परिक्रमा आयोजित करणार असलेबाबत शिर्डी येथिल शिर्डी परिक्रमा महोत्सवाचे आयोजक डॉ. जितेंद शेळके, अजित संपतलाल पारख व महोत्सव कमिटी खंडोबा मंदिर यांनी सदर महोत्सवाचे आयोजनाबाबत जाहीर केले होते .मात्र  सध्या कोरोना या रोगाचा प्रदुर्भाव सुरु असल्याने व सदर आजार हा संसर्गजन्य आजार असल्याने  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपली व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर यांनी  करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन अहमदनगर जिल्हयामध्ये उत्सवांना दिलेली परवानगी रद्द केली होती .तरीही आज या परिक्रमाचे आयोजन करून कायद्याचे उल्लंघन केले म्हणून परीक्रमेचे आयोजन करून गर्दी जमवुन, परीकमा रदद झाले बाबत प्रशासनास खोटी माहिती देवुन परीकमा संपन्न
केली. त्यामुळे  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अहमदनगर व मा. उपविभागीय
दंडाधिकारी शिर्डी भाग, शिर्डी यांचे कडील लेखी आदेशाची अवज्ञा केली म्हणुन भारतीय दंड संहिता १८६० (४५) यांच्या कलम १८८, १७७ नुसार अपराध केला. तसेच मा. डी.सी./कार्या/ ९ब१ / ४५६/ २०२० आदेश
अहमदनगर दि. ३/३/२०२० रोजीचे  जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) चे
उल्लंघन केले म्हणुन १३१, १३५, १३९ प्रमाणे शिर्डी परिक्रमा महोत्सवाचे आयोजक डॉ. जितेंद शेळके अजित संपतलाल पारख व महोत्सव कमिटी यांचेविरुध्द शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close