ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा;कोरोना योद्धयांचा सन्मान*

शेअर करा

 

शंकर होमकर
रायगड दि 6 जून

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज रायगड जिल्ह्यातील महाड येथील रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला .

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने यंदा साधेपणाने शिवराज्याभिषेक सोहळा करण्यात आला. समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आज मेघडंबरीतील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला.

प्रथम नगारखाना येथे युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहन, करण्यात आले. त्यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज शहाजीराजे छत्रपती यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मुर्तीसह राजसदरेवर आगमन झाले.युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक केले गेला. मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करून युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना मार्गदर्शन केले.

यावेळी युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीसह जवळच असलेल्या जगदीश्वराचे दर्शनासाठी प्रस्थान करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळास अभिवादन केले करण्यात आले.

दरम्यान, युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते राजसदरेवरून कोरोना योद्धया डॉक्टर्स, पोलीस यांनी केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्रमाणपत्र प्रदान केले .
युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांशी चर्चा करून गडावर कमीत कमी शिवभक्तांसह राज्याभिषेक सोहळा करण्याचा निर्णय घेतला होता. . काल सकाळी कोल्हापूरहून अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे काही कार्यकर्ते रायगडावर आले होते.

समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत व कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांच्या हस्ते काल सायंकाळी गडपूजन झाल्यानंतर मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर झाली. त्यानंतर शिर्काई देवीचा गोंधळ झाला. मशालींच्या उजेडात तो सादर करण्यात आला. शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके, गडपूजन व शिर्काई देवीच्या गोंधळाने शिवराज्याभिषेक सोहळ्याची पूर्वसंध्या काल रोमांचित झाला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close