ताज्या घडामोडीमराठवाडा

आष्टीत शिवसंग्रामच्या वतीने सरकारला निवेदन

शेअर करा


कडा (प्रतिनिधी )दि.५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण नाकारले गेले या मुळे मराठा समाजाला फार मोठा धक्का बसला आहे. समाजातील गरीब, अल्पभूधारक वा भूमिहीन, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी इत्यादींचे भले व्हावे यासाठी अनेक वर्षे चाललेला लढा निष्फळ झाला अशी नैराश्याची व संतापाची भावना निर्माण झाली आहे.
सरकार न्यायालयाचा संबंध नाही व जे पूर्णतः राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात उदा. सारथी संस्था, फी प्रतिपूर्ती, जिल्हावार वसतिगृह, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ इ. या बाबतीतही सरकार जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे.समाजाच्या या उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी शिवसंग्रामच्या वतीने लढा उभारला आहे.
सध्याची कोरोनाग्रस्त काळ पाहता, लॉकडाऊन संपल्यावर म्हणजे १जून ते ५जून या दरम्यान “बीड” येथे पहिला “मराठा आक्रोश मोर्चा” काढण्यात येणार आहे.

राज्य सरकारने आरक्षणा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात योग्य पावले उचलावीत व प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यासाठी आज शिवसंग्रामच्या वतीने, राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी व सर्व तालुक्यांच्या तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
आष्टी तालुका शिवसंग्रामच्या वतीने, आष्टी तहसिल कार्यालयात आज तहसीलदार राजाभाऊ कदम यांना निवेदन देण्यात आले.
शिवसंग्रामचे आष्टी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, राजु म्हस्के , धनंजय फिस्के , शिवसंग्राम विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बाबू धनवडे , दादा नवले, छोटू घोडके, शिवाजी म्हस्के, तात्या नालकोल, मयुर चव्हाण, भागचंद पोकळे, आदींनी निवेदनावर सह्या करून मराठा आरक्षण इशारा चे निवेदन दिले आहे .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close