ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Shivshahi-accident- *चंदनापुरी घाटात शिवशाही भस्मसात*

शेअर करा

 

संगमनेर दि.12 मार्च । आदेश वाकळे।
टीम सीएमन्यूज
पुणे नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटाचे खाली आनंदवाडी गावचे शिवारात शिवशाही बसला आग लागून बस भस्मसात झाली .सुदैवाने या बस मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही .

सकाळी आठच्या वाजेच्या सुमारास शिवशाही बस नाशिकहुन पुणे कडे जात असताना संगमनेर जवळील चंदनापुरी घाटात बस ने अचानक पेट घेतला.
ही घटना आनंदवाडी गावचे शिवारात अपना हॉटेल राजस्थान समोर घडली .
पुणेकडे जाणारी शिवशाही बस क्रमांक MH 14 GU 2445 हिने अचानक पेट घेतला .यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बस मध्ये एकूण २२ प्रवाशी होते.

या बसमधून एकूण 22 प्रवाशी प्रवास करत होते . घटना निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी बचावकार्यासाठी धाव घेतली. एका नागरिकाने अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी धाव घेतली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते . महामार्ग पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक बंद ठेवेली आली आहे.
चंदनापुरी घाटातुन वाहतूक वळविण्यात आली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close