ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*राज्यातील पहिल्या नागरी सुविधा केंद्राचे श्रीरामपूर येथे उदघाटन*

शेअर करा

 

 

श्रीरामपूर दि 4 मे ,टीम सीएमन्यूज

भारत सरकारने भारतीय टपाल खात्याला आता नागरी सुविधा केंद्र अशी ओळख निर्माण करून दिली असुन महाराष्ट्र राज्यातील पहिल्या नागरी सुविधा केंद्राचे उदघाटन श्रीरामपूर येथे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते व विभागीय पोस्ट कार्यालयाचे अधिक्षक एस. रामकृष्ण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
सर्वसामान्य लोकांपर्यंत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या तसेच खाजगी उपयोगिता पोहोचवण्यासाठी भारत सरकारच्या ई गव्हर्नन्स उपक्रमापैकी नागरी सुविधा केंद्र हा एक उपक्रम आहे. संपूर्ण देशात २१ आणि महाराष्ट्र राज्यात २ नागरी सुविधा केंद्र कार्यान्वित करण्यास भारत सरकारने मान्यता दिली आहे. त्यापैकी राज्यातील पहिले केंद्र आजपासून श्रीरामपूर येथे सुरु झाले आहे.यावेळी शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की,या केंद्रातून सर्वसामान्य गरजु लोकांना एकाच ठिकाणी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा तसेच खाजगी सुविधा पुरविण्यात येणार आहे त्यामुळे त्यांची गैरसोय दूर होईल.आणि अनेक सेवांचा लाभ एकाच केंद्रातून मिळणार असल्याने वेळ, श्रम आणि पैशांची बचत होणार आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही खासदार लोखंडे यांनी यावेळी केले. तर भारतीय डाक विभागाचे विभागीय अधिक्षक एस. रामकृष्ण यांनी यावेळी सुविधा केंद्राची उपयुक्तता स्पष्ट केली.
या केंद्राद्वारे देशातील प्रत्येक लाभार्थी नागरिकांना सरकारी योजनांच्या रकमा नियम व अटींच्या अधीन राहुन रोखीने देणे, सार्वजनिक दस्तऐवज आणि सेवा, देयके ,विमा सेवा, पोस्टल बँकिंग याबरोबरच विविध प्रकारच्या २२ सेवा सेवा देणारे व्हेंडर्स भारतीय टपाल खात्याशी संलग्न झाले आहेत.या सेवा आता नागरी सुविधा केंद्राच्या मार्फत लोकांना दिल्या जाणार आहेत. राज्यात प्रायोगिक तत्वावर श्रीरामपूर आणि पंढरपूर या दोन ठिकाणांची निवड या केंद्रांसाठी करण्यात आली आहे. त्यापैकी श्रीरामपूर केंद्राचे आज उदघाटन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून हा कार्यक्रम संपन्न झाला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close