क्राईम

*औरंगाबादेतील सातारा परिसरात सख्ख्या बहिण भावाची निर्घुण हत्या*

शेअर करा

 

महेश डागा

औरंगाबाद दि 10 जून
औरंगाबाद शहरात धक्कायक घटना समोर आली आहे. सातारा परिसरात बहीण – भावाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री ही घटना उघडकीस आली. या बाबत सातारा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण लालचंद राजपूत वय 19 आणि सौरभ लालचंद राजपूत वय 17 अस बहीण भावांचे नाव आहे. दोघांचे मृतदेह घरातील बाथरूम मध्ये आढळून आले असून, दोघांचाही गळा चिरून त्यांच्या हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सातारा परिसरात राहणारे लालचंद राजपूत कामा निमित्त पत्नी आणि मोठ्या मुलीसह जालण्याला गेले होते. रात्री आठच्या सुमारास ते परत घरी आले त्यावेळी घरात कोणाचीही हालचाल दिसून आली नाही. त्यांनी घरात प्रवेश केला असता घरातील सर्व रूममध्ये कोणीही आढळून आलं नाही. बाथरूम कडे त्यांनी तपासलं असता दोघांचेही मृतदेह आढळून आले. दोघांच्या गळ्यावर वार केलेले आढळून आले. किरण लालचंद राजपुत ही पुण्याच्या मॉडन कॉलेज येथे शिक्षण घेत होती तर भाऊ सौरभ राजपुत हा दहावी वर्गात शिकत होता. हत्या दुपारच्या सुमारास झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सुमारे एक किलो सोने, सहा हजार रू रोख, मुलीचा मोबाईल व अंगठी असा एैवज चोरीला गेल्याचेही फिर्यादित नमुद करण्यात आले आहे. हत्या कोणी ओळखीच्या इसमाने केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close