google.com, pub-5920674810493689, DIRECT, f08c47fec0942fa0
Saturday, December 21, 2024

मारकडवाडी येथे इव्हीएम मशीनचे मिरवणूक

अपयश झाकण्यासाठी विरोधकांचा खटाटोप असल्याचा भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा आरोप

सोलापूर : प्रतिनिधी

Solapur markadwadi evm news मारकडवाडी येथून ईव्हीएम मशीन विरोधी आंदोलनाचा एल्गार महाविकास आघाडीच्या वतीने पुकारला हेाता. याठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या आंदोलनाला प्रोत्साहन दिले आहे. याचा समाचार घेण्यासाठी महायुतीकडून मंगळवारी आमदार गोपीचंद पडळकर, आ सदाभाऊ खोत आणि माजी आ राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली ईव्हिएम मशीनची बैलगाडीतून मिरवणूक काढली.

तसेच यावेळी शरद पवार यांच्यासह विरोधातील अनेक नेत्यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत प्रचंड अपयश आले आहे. ते अपयश झाकण्यासाठी त्यांनी ईव्हिएम मशीनवर आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच विरोधात लढण्यासाठी आता कोणताच मुद्दा राहिला नाही. त्यामुळे ईव्हिएम मशीनचे राजकारण करण्याचा प्रयत्न विरोधी महाविकास आघाडीकडून होत असल्याचा आरेाप ही यावेळी करण्यात आला.

यावेळी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी शरदचंद्र पवार यांच्यासह विरोधी नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच लोकसभेत यांना चांगली मते पडली तेव्हा यांनी ईव्हिएम मशीनवर आरोप केले नाहीत मग आता का आरोप करता असा सवाल ही गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला. तसेच या ठिकाणी निवडून आलेले आमदार उत्तम जानकर आणि या गावात सर्वाधिक असलेल्या धनगर समाजाला पुढे करुन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि जयंत पाटील राजकारण करित असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. त्यामुळे जयंत पाटील, रोहित पवार यांनी पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याचे आवाहन ही पडळकर यांनी केले.

तर यावेळी बोलताना माजी आ राम सातपुते यांनी विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी केली तसेच भ्रष्ठाचार करुन आर्थिक संपत्ती मिळवलेल्या मोहिते पाटील कुुंठुबातील अनेकांना लवकरच जेलमध्ये बसण्याची वेळ येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ही मारकडवाडीला भेट, गावकऱ्यांशी साधला संवाद

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही मंगळवारी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे भेट देवून त्या ठिकाणी असलेल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी नागरिकांनी पहिल्यांदा आवाज उठवला त्यानंतर आ उत्तम जानकर यांनी पुढाकार घेतला आणि मारकडवाडीची चर्चा जिल्हा, राज्यात आणि देशात सुरु झाली. सत्तेत आलेले सरकार सर्वसामान्यांचे नाही ही तर पेशवाई असल्याचा आरोप पटोले यांनी केला. तसेच भाडोत्री काही मंडळी या ठिकाणी आणून भाषणबाजी भाजपाने सुरु केल्याचे पटोले यांनी सांगितले. ज्या प्रमाणे मिटाचा सत्याग्रह महात्मा गांधी यांनी केला होता.त्यानुसार आता देशाचे स्वातंत्र्य अबाधित रहावे यासाठी लोकशाहीची लढाई आणि चळवळ आता मारकडवाडीतून करण्याचा निर्णय काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी घेतला आहे. लवकरच या चळवळीला आता मुर्त रुप येणार असल्याचे ही नाना पटोले यावेळी म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles