ताज्या घडामोडीमराठवाडा
सोलेवाडीतील तो हल्ला बिबट्याचा नव्हे!वन विभागाचा दावा
शेअर करा
सोलेवाडीतील तो हल्ला बिबट्याचा नव्हे!वन विभागाचा दावा
आष्टी दि 3 डिसेंबर
सोलेवाडी येथे बिबट्याने शेतात पाणी देत असलेल्या शेतकऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली मात्र हा हल्ला बिबट्याने केला नसल्याचा खुलासा वन विभागाने केला आहे.
सोलेवाडी येथील शेतकरी विकास झगडे हे आपल्या ज्वारीच्या शेतात पाणी देत असताना त्यांच्या वर बिबट्याने हल्ला केला असल्याचा दावा त्यांनी केला मात्र हा हल्ला नसून घाबरून त्यांना कंपाऊंड ची तार लागली आहे.तर ज्या ठिकाणी झगडे यांच्यावर हल्ला केला त्या शेतात ससा आणि लांडग्यांच्या पावलांचे ठसे आढळून आले.तर बिबट्याच्या पावलांचे ठसे कुठेही आढळून आले नसल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शाम शिरसाठ यांनी सांगितले.
हेही:त्या’बिबट्याला ठार मारण्याचा प्रस्ताव विभागीय अधिकार्याकडे दाखल;आ. आजबे यांची सूचना