ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*राज्याने ओलांडला १ कोटी चाचण्यांचा टप्पा राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्क्यांवर*

शेअर करा

 

 

मुंबई, दि.२० प्रतिनिधी

राज्यात आज ६९४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आज राज्याने १ कोटी चाचण्यांचा टप्पा ओलांडला. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ४२ हजार ९१६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.८९ टक्के एवढे झाले आहे.

दरम्यान, आज राज्यात ५,६४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्याचा मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३५ हजार ६६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ६८ हजार ६९५ (१७.६२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ०९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,८८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन ७८ हजार २७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा:२९० बाधितांची रुग्णसंख्येत भर;१७० रुग्णांना डिस्चार्ज

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close