ताज्या घडामोडीदेश विदेश

*डीआरडीओच्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी*

शेअर करा

अहमदनगर,2 ऑक्‍टोबर प्रतिनिधी

स्वदेशी बनावटीच्या लेझर गाईडेड रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी करण्यात आली.एमबीटी अर्जुन या रणगाड्यावरून अहमदनगर इथल्या केके रेंज इथे ही चाचणी घेण्यात आली. याआधी 22 सप्टेंबर 2020 ला  अशी चाचणी घेण्यात आली होती. अनेक प्लॅटफॉर्म वरून सोडण्याची क्षमता राखणाऱ्या या  क्षेपणास्त्राच्या सध्या तांत्रिक मुल्यांकन चाचण्या सुरु आहेत.

हाय एनर्जी मटेरिअल्स रिसर्च लॅबोरॅटरी  (एचईएमआरएल) पुणे, आणि इन्स्ट्रुमेंट्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (आयआरडीई) डेहराडून यांच्या सहकार्याने आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅबलिशमेंट (एआरडीई) पुणे  यांनी हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.

संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी यशस्वीचाचणीबद्दल डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेसाठी मार्ग  प्रशस्त करणाऱ्या या कामगिरीसाठी डीआरडीओ च्या अध्यक्षांनी डीआरडीओच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा:अहमदनगर येथे एमटीबी अर्जुन रणगाडा वरून क्षेपणास्त्र यशस्वी चाचणी

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close