ताज्या घडामोडीमराठवाडा

*उसतोडणी मजुरांना मिळणार कोलम तांदूळ,सहबारा वस्तूंची कीट*

शेअर करा

 

बीड दि, १० मे टीम सीएम न्यूज

Advertisement

 

बीड जिल्ह्यातून पर जिल्ह्यात उसतोडणी साठी गेलेल्या मजुरांना बीड जिल्ह्यात परत येत आहेत.हे मजूर  गावाबाहेर क़्वारनटाइन करण्यात आले आहेत . मात्र या मजुरांना गावाबाहेर राहावे लागत असल्याने त्यांचे खाण्याचे हाल होत होते.यावर प्रशासनाने  उपाययोजना केल्या असून जिल्हा परिषदेच्या फंडातून त्यांना कोलम तांदूळ खाण्यासाठी मिळणार आहे. त्यासोबत इतरही जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषदेने याचा निधी संबंधित पंचायत समितींना वर्ग करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात हजारो उसतोडणी मजूर परत आला आहे. हा मजूर आपल्या गावाच्या बाहेर झोपड्या टाकून राहत आहे.या मजुरांना गावात येऊ दिले जात नसून त्यांच्या हातावर शिक्के मारून त्यांना  होम क़्वारनटाइन करण्यात आले असल्याने त्यांची खाण्याची आबाळ होत असल्याने त्यांच्या साठी जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला असून या मजुरांच्या कुटुंबियांना १२ जीवनावश्यक असलेल्या वस्तूंची कीट दिली जाणार आहे. ही कीट ग्रामपंचायतीच्या मार्फत दिली जाणार आहे.

काय असणार या कीट मध्ये ?

तांदूळ कोलम पाच  किलो, सोयाबीन तेल एक किलो,साखर एक किलो , तुरडाळ उच्च प्रतीची एक किलो , मीठ आयोडीन युक्त बारीक एक किलो , मिरची पावडर २०० ग्राम,हळद पावडर १०० ग्राम,कांदा लसून मसाला २०० ग्राम, जिरे १०० ग्राम, मोहरी १०० ग्राम साबण अंगाचा ७५ ग्राम, लाईफबाय किंवा detol एक नग ,साबण कपड्याचा ७५ ग्राम वजनाचा एक नग व्हील या वस्तूंचा समावेश आहे.

 

या सर्व वस्तूंची खरेदी करण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली असून जिल्ह्यातील ११ वर्ग एकच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ह्या कीट २३५ सनियंत्रण अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली वाटप केली जाणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा  शिवकन्या शिवाजी शिरसाठ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले.बीड जिल्ह्यात पाच मे अखेर  ६९५ ग्रामपंचायत मध्ये  १००९८ मजूर दाखल झाले असून ते सर्व गावाबाहेर क़्वारनटाइन करण्यात आले आहेत.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: