ताज्या घडामोडीमराठवाडा

*उसतोडणी मजूर आंदोलन तीव्र;आमदार सुरेश धस यांना अटक आणि सुटका*

शेअर करा

 

आष्टी दि १६ प्रतिनिधी

उसतोडणी कामगार साखर कारखान्याकडे जाणाऱ्या उसतोडणी मजुरांना अडविल्या प्रकरणी आमदार सुरेश धस यांच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यातून वा राज्यातून उसतोडणी मजूर कारखान्यावर जाऊ नये यासाठी आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. विधान परिषद सदस्य सुरेश धस यांनी यापूर्वी आवाहन करून जो कोणी उसतोडणी मजूर जातानाचि माहिती देतील त्यांना दोन हजार रुपये देणार असल्याचे जाहीत केले होते.

हेही वाचा :बीड जिल्ह्यात कोरोना उच्चांक

राज्य सरकार आणि उसतोडणी कामगार यांच्या संघटना यांच्यामध्ये बोलणी सुरु आहे. वाकी शिवारातून  उसतोडणी कामगार कारखान्याकडे जात असल्याचे उसतोडणी कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्या मजुरांना अडवून त्यांना थेट आष्टी येथे आणण्यात आले.या प्रकरणी रियाझ कलीम पठाण यांच्या फिर्यादीनुसार विधान परिषद सदस्य सुरेश धस उसतोडणी संघटनेचे भाऊसाहेब आंधळे यांच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३४१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना अटक करून जामिनावर सुटका करण्यात आली.

आमदार सुरेश धस यांना अटक केल्याप्रकरणी आष्टी येथे खडकत चौकात भारतीय जनता पार्टी, स्व.गोपीनाथ मुंडे उसतोडणी मजूर संघटना,आमदार सुरेश धस मित्र मंडळच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून आंदोलन केले.

यावेळी बोलताना सुरेश धस यांनी संगितले कि, ट्रक मध्ये १०० आयशर ७०, ४०७ टेम्पो मध्ये   ६० एवढे  लोक मजूर संप मोडून मोडून काढण्यासाठी कारखाने घेऊन जात आहेत. यांची कोरोना टेस्ट केली का एवढे मजूर नेण्याचा परवाना आहे का ? यावर सरकार काय कारवाई करणार असा सवाल त्यांनी विचारला आहे.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: