ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

हत्या करून बिबट्या मोकाट;हे गाव अजूनही बिबट्याच्या दहशतीखाली

शेअर करा

 

आष्टी दि 25 प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे दिवसा पंचायत समिती सदस्या आशा गर्जे यांच्या पतीवर बिब ट्याने हल्ला करून ठार केल्यानंतर आज गावात शांतता पसरली असून संपूर्ण गाव शोकाकुल झाले तर बिबट्याची दहशत या भागात पहावयास मिळते.

दि 24 रोजी नागनाथ गर्जे यांच्यावर त्यांच्या शेतात दुपारी दोन ते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. ह्या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी या गावात धाव घेतली .गावातील तरुण आणि धडपडा कार्यकर्ता म्हणून गर्जे यांची ओळख होती. त्यांच्या मृत्यूनंतर गावात सायंकाळ पासून शांतता पसरली होती .घरातील चुली बंद होत्या तर नागरिक शोकमग्न होती.
सकाळी गर्जे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा:शासनाच्या वतीने बिबट्याच्या हल्ल्यात मयत नागनाथ गर्जे यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत जाहीर

गावावर अचानक आलेल्या संकटामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.लहान मुलांना घराबाहेर पाठविण्यास धजावत नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील केळवंडी आणि मढी येथे दोन बालकांची बिबट्याने हल्ला करून हत्या केली होती .तर आज पहाटे अहमदनगर जिल्ह्यातील पाडळी शिवारात नऊ वर्षाच्या बालकांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी आहे.

बीड अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बिबट्याचा वावर वाढला असल्याचे गेल्या काही दिवसांपासून येणाऱ्या घटनांवरून दिसून येत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close