ताज्या घडामोडी

*शिक्षक दिनाच्या निमित्ताने शासनाची #Thank A Teacher मोहीम*

शेअर करा

 

अहमदनगर दि १ प्रतिनिधी

भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त ५ सप्टेंबर “शिक्षक दिन” साजरा करण्यात येतो.यंदा हा शिक्षक दिन साजरा करणे शासनाला शक्य नसल्याने आणि कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर शिक्षकांप्रती समाजातील आदर आणखी वृद्धिंगत होण्यासाठी शासनाने #Thank A Teacher मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये समाजातील सर्व घटकांचा सहभाग अपेक्षित आहे.

काय आहे #Thank A Teacher मोहीम

समाजातील घटकांनी समाज माध्यमातून व्यक्त होण्यास संधी देण्यात आली आहे.यासाठी ट्विटर, फेसबुक, आणि इंस्टाग्रामवर हॅश टॅग बनविण्यात आले आहेत . शिक्षक दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारने
माझे प्रेरक शिक्षक” या उपक्रमाचे आयोजन केले आहे.यासाठी #Thank A Teacher ही मोहीम राबवण्यात येत आहे  Facebook handle : Thxteacher,
Twitter:@thxteacher1,Instagram:@thankuteacher1,
या सोशल मीडियाद्वारे राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. यामध्ये समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी विधान सभा / विधान परिषद / लोकसभा / राज्यसभा सदस्यांनी आपापल्या मतदार संघात अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा व आपल्या मतदारसंघातील जिल्ह्यातील जे शिक्षक कौतुकास पात्र आहेत, त्यांचा या मोहिमेत भाग घेऊन सन्मान करावा.असे शासनाने जाहीर केले आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये शिक्षक हा अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. दरवर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी ज्या शिक्षकांनी शिक्षणक्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे,  Covid-१९ या रोगाच्या पार्श्वभूमीवर, या वर्षी शिक्षक दिन नेहमीप्रमाणे साजरा करता येणे शक्य नसले तरी, त्या व्यक्तीबद्दल ५ सप्टेंबर, २०२० ला प्रत्येक व्यक्ती, विद्यार्थी, पालक, शिक्षक, अधिकारी, सर्व क्षेत्रातील मान्यवर व समाजातील सर्वांनाच आपल्या जीवनात ज्या व्यक्तीला गुरू मानतो त्यांच्याप्रती आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी Thank A Teacher अभियान राबविण्यात येत आहे.

समाजाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे शिक्षक येतात की ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला नवीन वळण मिळत जाते. आयुष्याच्या अश्या वळणावर या शिक्षकांनी आपणांवर विश्वास दाखवून, आपल्या कठीण परिस्थितीत मदत केलेली असते. आपल्याला आवश्यक असेल अशावेळी आपल्यातील आत्मविश्वास जागृत करून यश संपादनासाठी प्रोत्साहित केलेले असते. ज्या शिक्षकांनी आपल्या आयुष्यात परिवर्तन आणले अशा शिक्षकांचे “आभार” व्यक्त करण्यासाठी शासनाने एक अभियान राबविण्याचे ठरविले आहे. ह्या अभियानांतर्गत ५ सप्टेंबर या शिक्षक दिनानिमित्त आपल्या अश्या आवडत्या शिक्षकांबद्दल भावना व्यक्त करण्याची संधी सर्वांना देण्यात येत आहे.Covid-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत.त्यासाठी शिक्षकांची नवीन कौशल्य, नवीन शैक्षणिक साधने वापरण्याची इच्छा दिसून येते. केवळ शाळेमध्ये जाऊन शिकवणे, या पलीकडे जाऊन आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षक मुलांना शिक्षण देत आहेत. ज्या ठिकाणी अशा आधुनिक सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत, अशा ठिकाणी काही शिक्षक स्वतः पुढ़ाकार घेऊन मुलांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना शिक्षण / ज्ञानदान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत. असे हे शिक्षक निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे अमुलाग्र बदल झाले, जी प्रगती झाली, ती शब्दरूपाने व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारने  माझे प्रेरक शिक्षक” या उपक्रमाचे आयोजन केले आहे.यासाठी

#Thank A Teacher ही मोहीम राबवण्यात येत आहे.
Facebook handle : Thxteacher, Twitter :@thxteacher1,
Instagram : @thankuteacher1,
या सोशल मीडियाद्वारे राबविण्याचे ठरविण्यात आले आहे.यामध्ये समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी  उपक्रम राबविण्याचे ठरविले असून सूचित करण्यात येत आहेत.
५ सप्टेंबर २०२० रोजी प्रस्तावित कृति कार्यक्रम –
“शाळा बंद शिक्षण सुरु उपक्रम यशोगाथा सादरीकरण-
कोविड-१९ च्या प्रादूर्भावादरम्यान या शैक्षणिक सत्रात शाळा बंद असल्या तरी विविध माध्यमातून, उपक्रमातून मुलांचेशिक्षण सुरु राहण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमांच्या यशोगाथांचे सादरीकरण केंद्रस्तर,तालुका स्तर व जिल्हा स्तरा वरून करण्यात यावे.
कोविड -१९ काळातील शिक्षणावर परिसंवाद शाळा बंद असल्या तरी वाडी वस्त्या, तांडे, दुर्गम व शहरी भागातील शिक्षकांसोबत काही स्वयंसेवक, शिक्षक मित्र शिक्षण देण्याचे काम स्वयंस्फूर्तीने करू करीत आहेत. अशा व्यक्तींचे वेबिनार तालुका, जिल्ह्यात आयोजित करण्यात यावेत.यामध्ये शाळाव्यवस्थापन समिती व पालकांना सहभागी करून घ्यावे.
वक्तृत्व, निबंध, पोस्टर, घोषवाक्य, कविता, प्रेरणा व प्रबोधनात्मक गीतवाचन, नाट्यवाचन, अभिवाचन स्पर्धा- शिक्षक दिनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी विविध विषय देऊन online वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा , घोषवाक्य स्पर्धा, शब्द देऊन कविता तयार करणे, प्रेरणा व प्रबोधनात्मक गीतवाचन, नाट्यवाचन, अभिवाचन स्पर्धांचे आयोजन करण्यातयावे.
मी कोविडयोद्धा- कोविड-१९ च्या प्रादूर्भावाच्या काळात शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील अधिकार्यांनी शिक्षण देण्याव्यतिरिक्त “कोविड योद्धा” म्हणून विविध कामे पार पाडली उदा.तपासणी करणे, बाहेरून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करणे, विलीगीकरण कक्षामध्ये निरीक्षक म्हणून व इतर या कामाचे अनुभव कथन करून त्यांचे कामाचे कौतुक करण्यात यावे.
शैक्षणिक रांगोळी, चित्रकला, सुशोभन स्पर्धा आयोजनकरणे.
शिक्षणाच्या प्रयोगशील शाळांचे सादरीकरण करणे.
शिक्षक असलेले पण आता उच्च पदावरील व्यक्तीच्या मुलाखती घेणे / स्वतः व्हिडीओ तयारकरूनपाठविणे.उपरोक्त उपक्रमांचे आयोजन करीत असताना माझे प्रेरक शिक्षक” या विषयाला प्राधान्यदेण्यात यावे. याद्वारे समाजातील उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळेल. या उपक्रमातून विद्यार्थी, पालक व अधिकार्यांना त्यांच्या शिक्षकांचे आभार मानण्याची ज्यांच्यामुळे ते आज विविध पदावर कार्यरत आहेत, त्या शिक्षकांचे आभार मानण्याची एक संधी आहे.

विधान सभा / विधान परिषद / लोकसभा / राज्यसभा सदस्यांनी आपापल्या मतदार संघात अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा व आपल्या मतदारसंघातील जिल्ह्यातील जे शिक्षक कौतुकास पात्र आहेत, त्यांचा या मोहिमेत भाग घेऊन सन्मान करावा. या
मोहिमेमध्ये खाजगी शिक्षण संस्था व समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून आपल्या गुरूला त्याचे प्रती असलेल्या भावन व्यक्त करून शब्दरूपी गुरुदक्षिणा द्यावी. आपल्याला ालेले यश आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मिळाले हे आपल्या शब्दात व्यक्त
हीच आपली गुरुदक्षिणा ठरेल.

“8#Thank A Teacher या मोहिमेमध्ये शक्य असेल तेथे चित्रपट क्षेत्रामध्ये काम करणार्या मान्यवर अभिनेत्यांचा अथवा अन्य क्षेत्रातील जसे कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, संशोधन,राजकीय, इ. क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग अवश्य घ्यावा.असेही या परिपत्रकाद्वारे सुचविण्यात आले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close