मराठवाडाशैक्षणिक

*दहावी बोर्डाच्या उत्तर पत्रिका बोर्ड प्रतिनिधी मार्फत स्विकाराव्यात- राजकुमार कदम*

शेअर करा

 

बीड दि, 21 मे टीम सीएमन्यूज

राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे त्या पार्श्वभूमीवर दहावी बोर्डाच्या तपासलेल्या उत्तर पत्रिका बोर्डाच्या प्रतिनिधी मार्फत जिल्ह्यातील नेहमीच्या वितरण केंद्रावर स्विकारण्यात याव्यात अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव राजकुमार कदम यांनी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत राजकुमार कदम यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की कोरोना महामारीने राज्यात थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यात संचारबंदी, लाॅकडाऊन करण्यात आले आहे. दहावी बोर्डाच्या तपासलेल्या उत्तर पत्रिका बोर्डात जमा करण्यासाठी नियमकांना बोलावलेआहे. औरंगाबाद हे कोरोना विषाणूचे हाॅट स्पाॅट असल्याने आणि विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यातील नियामक एकाच ठिकाणी जमा झाल्याने गर्दी होऊन कोरोना प्रसार होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या नेहमीच्या वितरण केंद्रवर बोर्ड प्रतिनिधी मार्फत उत्तर पत्रिका जमा कराण्याचे संबंधितांना आदेश द्यावेत अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव राजकुमार कदम यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष/ सचिव यांचेकडे ई-मेल द्वारे निवेदन पाठवून केली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close