fbpx
ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना यातून बाहेर काढणं हे राज्यासमोरील आव्हान-शरद पवार*

शेअर करा

 

 

तुळजापूर दि १९ प्रतिनिधी

Advertisement

 

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तीव्रता या भागात म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या भूकंपा इतकीच मोठी असल्यामुळे जिल्हा संकटात आहे अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्राला कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांचं पिकांचे अतोनात नुकसान झाल असून पिक विमा निकषात दुरुस्ती करण्याची गरज आहे. राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना यातून बाहेर काढणं हे राज्यासमोरील आव्हान असून त्यासाठी केंद्र सरकार कडे पुरावा करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज तुळजापूर येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेती पिके ऊस सर्वाधिक नुकसान झालेलं आहे तसंच शेती खरडून वाहून गेल्यामुळे शेतकऱ्याचं वर्षभराच नुकसान झाल  आहे त्यामुळे या नुकसानीची तीव्रता पाहता शेतकऱ्याला मोठ्या मदतीची तसंच शेतांच्या बांधबंदिस्तीची  गरज आहे असेही ते यावेळी म्हणाले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे उस गाळपाला अयोग्य झाला असून अडचणीत सापडलेली साखर कारखानदारी असल्यामुळे या भागातील कारखानदारी अभावी याचं मोठं नुकसान आहे त्यामुळे चौकटीच्या बाहेर जाऊन मदत करण्याची गरज शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली. शेतकरी कायद्यातील काही मुद्द्यांना विरोध होतो आहे शेतातील उत्पादित होणाऱ्या मालाला भाव ठरवण्याचा अधिकार देण्यावरून काही राज्यात होणारा विरोध दिसतो आहे  किमान आधारभूत किमती ठरवण्याचा अधिकार सरकारला आता राहणार नाही कारण खाजगी व्यापारी आणि कंपन्या शेतमाल खरेदी करण्यास येण्यास वाव मिळाल्यामुळे किमान हमी भाव सरकार देणार की नाही याचा  या कायद्यात कुठेही उल्लेख नसल्यामुळे काही राज्यात विरोध होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा :डिजिटल माध्यमांना चांगले दिवस येणार 

 

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close