Tuesday, December 3, 2024

नीट घोटाळा प्रकरणी आरोपी संजय जाधवला न्यायालयाने सुनावली ०२ जुलैपर्यंत

लातूर

The court heard the accused Sanjay Jadhav in the NEET scam case till 02 July नीट-२०२४ परीक्षा घोटाळ्यातील आणखी एका आरोपीला लातूर पोलिसांनी अटक केली आहे. संजय जाधव असे या आरोपीचे नाव असून ०४ पैकी ०२ आरोपीना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकूण चार जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. नीट परीक्षा देणाऱ्या १२ विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेश पत्र आरोपी संजय जाधव आणि जलीलखान पठाण यांच्या मोबाईलमध्ये आढळून आले आहेत. त्यानुसार ते विद्यार्थी आणि पालकांकडून नीट परीक्षेत गुण वाढवून देण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करत असत. याकामी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील ईरन्ना कोनगुलवार आणि दिल्ली इथे राहणारा गंगाधर नावाचा आरोपी मदत करीत असत असे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. दरम्यान आरोपी संजय जाधव याला न्यायालयापुढे आज हजर केलं असता त्याला ०२ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर ईरन्ना कोनगुलवार या आरोपीलाही ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान दिल्ली येथील आरोपी गंगाधर याचा अद्यापही लातूर पोलीस शोध घेत असल्याची माहिती आहे. गुन्ह्याचा पुढील तपास लातूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे हे करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles