क्राईमताज्या घडामोडी

*डॉक्टरकी रद्द केलेल्या डॉक्टरची पुन्हा डॉक्टरकी;गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु*

शेअर करा

 

 

 

बीड दि.६ सप्टेंबर, प्रतिनिधी

 

बेकायदेशीररित्या गर्भपात गुन्ह्यात शिक्षा झालेले परळीतील डॉ सुदाम मुंडे यांची डॉक्टरकीहि रद्द केली असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा डॉक्टरकी सुरु केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाल्यानंतर डॉ मुंडे यांच्या हॉस्पिटलवर छापा टाकून कारवाई करण्यात आली.

बीड जिल्ह्यातील परळी येथील डॉ  सुदाम मुंडे यांना अवैध गर्भपात प्रकरणी शिक्षा झाली आहे. त्याचबरोबर न्यायालयाने त्यांचे वैद्यकीय व्यवसायाचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे मुंडेला वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही. जामिनावर बाहेर आलेल्या मुंडे याने पुन्हा वैद्यकीय व्यवसाय सुरु केल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या आदेशाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांच्यासह वैद्यकीय पथकाने पोलिसांसमवेत छापा टाकून वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित वस्तू जप्त केल्या. ही कारवाई रात्री उशिरा करण्यात आली. परळी पोलिसांनी सुदाम मुंडे याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया परळी पोलीस ठाण्यात सुरु आहे.

 

“सुदाम मुंडे याचा वैद्यकीय व्यवसायाचा परवाना न्यायालयाने रद्द केला आहे,तरीही तो वैद्यकीय व्यवसाय करत असल्याच्या माहितीवरून त्याच्या हॉस्पिटलवर छापा टाकला आहे. यासंदर्भात परळी आरोग्य विभाग परळी पोलिसात तक्रार दाखल करत आहे.”-डॉ अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक,बीड

 

हेही वाचा:बीड जिल्ह्यात ११० कोरोना बाधित;एसआरटी च्या ५ बाधितांचा समावेश

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close