fbpx
क्राईममराठवाडा

*आष्टीतील वाळू माफीयांची मुजोरी वाढली;पंचनामा सुरू असतानाच पळवली बोट*

शेअर करा

 

आष्टी दि 20 प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील वाळू माफीयांची मुजोरी वाढल्याचा प्रकार

Advertisement
समोर आला. सिना पात्रातुन वाळु उपसा करणारी बोट महसूल विभागाने पकडली खरी पण पंचनामा आणि ताबा पावती करत असताना अंधाराचा फायदा घेऊन चक्क पोलिस, महसूल पथकांच्या डोळ्यादेखत बोटच पळविल्याची प्रकार पुढे आला आहे.त्यांतर पाच तासाच्या शोधानंतर पात्रातुन ती बोट पुन्हा जप्त करण्यात आली.

याबाबतचे वृत्त असे की, आष्टी तालुक्यातील वाकी शिवारातील सिना पात्रामधून बोटीच्या साहाय्याने वाळु उपसा करत असल्याची माहिती तहसीलदार यांना समजात त्यांनी महसूलचे पथक घेऊन ती उपसा करणारी बोट दुपारी दोनच्या सुमारास पकडली. परिश्रम घेऊन नदी काठाला लावली. मग पंचनामा व ताबा पावती करत असताना अंधार पडला साडेसात आठच्या दरम्यान पंचनामा व ताबा पावती करत असताना महसूल व पोलिस यांची नजर चुकवत ती बोट पळवली. वाळू बोट पळवल्याचे लक्षात येताच महसूल पोलिस यांनी शोध मोहिमेला सुरुवात केली आणि ती बोट मध्यरात्री एकच्या सुमारास मिळुन आली.तब्बल पाच तास बोट गायब झाल्याने महसूल व पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली होती. ही कारवाई तहसीलदार राजाभाऊ कदम, नायब तहसीलदार निलिमा थेऊरकर, पोलिस निरीक्षक सलिम चाऊस, मंडलधिकारी इंद्रकांत शेंदुरकर, मंडलधिकारी पी.के.माडेकर, तलाठी प्रविण बोरूडे, तलाठी नवनाथ औंदकर, तलाठी जगदीश राऊत, यांनी केली.

 

हेही वाचा:शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार! शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close