ताज्या घडामोडीमराठवाडा

*पत्नीपीडितांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत पत्नीपासून मुक्तीची याचना*

वटसवित्रीच्या दिवशी याचना

शेअर करा

 

महेश डागा
औरंगाबाद, दि 5 जून

एकीकडे जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा यासाठी महिला वटसावित्री पौर्णिमा साजरी करत असताना दुसरीकडे औरंगाबादेत पत्नीपीडितांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत ही पत्नी आता नको ही मनोकामना व्यक्त केली.
जगभर कोरोनाचे सावट आहे त्यासाठी देश लढतो आहे. परंतु पत्नी पीडितांवर तर लग्न झाल्याच्या दिवसापासून कोरोनापेक्षा भीषण संकट आले आहे. हे संकट घालवण्यासाठी पुरुषांच्या बाजूचे कायदे देखील नाही. त्यामुळे अशा बायका नको म्हणून मुंजा म्हणून पिंपळाच्या झाडाला साकडे घातले असल्याची माहिती पत्नी पीडित संघटनेचे प्रमुख भारत फुलारी यांनी सांगितले.

पत्नी पासून पीडित असलेल्या पुरुषांना न्याय देण्यासाठी तीन वर्षांपूर्वी पत्नी पीडित आश्रमाची सुरुवात करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून वटसावित्रीच्या दिवशी महिला हाच नवरा मिळावा अशी मनोकामना करत असताना पत्नीपीडित पुरुष या आश्रमात पिंपळाची पूजा करतात. आणि पीडित पुरुषांच्या पत्नीसोबत हा शेवटचा जन्म असू दे. अशी मनोकामना पत्नीपीडित पुरुष करतात. आज देशात जे काही कायदे आहेत ते कायदे फक्त महिलांच्या बाजूने आहेत. प्रत्येकवेळी पुरुष नाही तर काही वेळा महिला देखील पुरुषाच्या कुटुंबियांना छळतात. मात्र अश्यावेळी स्त्रियांनी केलेली खोटी तक्रार ग्राह्य धरली जाते. आणि पुरुष कायद्याच्या नजरेत दोषी ठरतात. अनेक पुरुष पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करतात मात्र त्यांना न्याय मिळत नाही. अशी पत्नीजर पतीला छळण्यासाठी आणखी जन्म मागत असेल तर तो देऊ नये. हाच शेवटचा जन्म समजावा अशी विनवणी आजच्या दिवशी पत्नीपीडित पुरुष या आश्रमात करतात. सरकारने पुरुषांच्या बाजूने देखील कायदे करावेत अशी मागणी पत्नीपीडित संघटनेने केली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close