ताज्या घडामोडी

बिबट्याला पकडण्यासाठी केल्या ह्या उपयायोजना; वन विभागाची यंत्रणा कार्यरत

शेअर करा

 

आष्टी दि २५ प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात नागनाथ गर्जे यांचा मृत्यू झाल्यानतर वन विभाग खडबडून जागा झाला.घटना घडल्यापासून वन विभाग ची यंत्रणा कार्यरत झाली. जिल्हा वनाधिकारी तेलंग यांच्यासह कर्मचार्यांनी हा भाग पालथा घालून बिबट्याला पकडण्यासाठी यंत्रणा सज्ज केली.

सुरुडी येथील नागनाथ गर्जे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला. यापूर्वी शेजारच्या नगर जिल्ह्यात असे हल्ले झाले होते. त्यामुळे वनविभागाची यंत्रणा कामाला लागली.

आज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटना घडली त्या वाघ दऱ्यातील घटना स्थळाला भेट दिली. यामध्ये बीड जिल्हा वन अधिकारी तेलंग यांनी जिल्ह्यातील  विविध तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासह कर्मचारी यांना घेऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. तत्पूर्वी त्यांनी घटना स्थळाला भेट देऊन पाहणी केली .त्यांनी कर्मचार्यांसह संपूर्ण भाग पिंजून काढला .त्यानंतर या भागात तीन ठिकाणी पिंजरे लावण्यात आले .त्याचबरोबर दोन ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले.वन विभागाने केलेल्या पाहणीत गर्जे यांच्या शेतात बिबट्याचे पंजे आढळून आले तसेच या बिबट्याने गर्जे यांना ठार केल्यानंतर त्यांना घेऊन झाडावर चढण्याचा प्रयत्न केला असावा.त्याच्या खुणाही या झाडाच्या खोडावर आढळून आल्या आहेत.

 

हेही वाचा: हत्या करून बिबट्या मोकाट; गाव अजूनही बिबट्याच्या दहशती खाली

 

या बिबट्याला पकडण्यासाठी बीडचे वनाधिकारी तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ, वनपाल काकडे, वनपाल बाबासाहेब  शिंदे यांच्यासह कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close