ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

*ही सरकार पुरस्कृत दहशत: श्री देवेंद्र फडणवीस*

शेअर करा

 

मुंबई दि 9 सप्टेंबर, वृत्तसंस्था

मुंबई महानगरपालिकेने  अभिनेत्री कंगना राणोत (kangana ranaut)हिच्या बंगल्यावर केलेल्या कारवाईची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis}यांनी समाचार घेतला असून  कंगनाच्या विरोधातील ही कारवाई सरकार पुरस्कृत दहशत असल्याचे म्हटले आहे.

आज मुंबई महानगरपालिकेने अभिनेत्री आणि निर्माती कंगना राणोत(kangana ranaut) हिच्या बंगल्यावर कारवाई करून त्याचा काही भाग पडला. या या कृतीमुळे भाजपचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका करत इतर अवैध बांधकामावर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis}म्हणाले कि, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात इतके घाबरट आणि लोक्स्खाई विरोधी सरकार यापूर्वी कधीही बघितलेलं  नाही ,आपल्या विचारांचा विरोध  करणारे व्यक्ती असतील पत्रकार असतील मिडिया कर्मी असतील सर्वांचे दमन करण्याचे काम,सर्वाना दाबण्याचे काम या  सरकारच्या माध्यमातून अवैधपणे  होत आहे .ज्या प्रकारे एखाद्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अवमान होतो  किंवा मुंबई  पोलिसांचा अवमान होतो,त्या वक्तव्याचे समर्थन करता येत नाही पण सरकारच्या अशा कृतीचे समर्थन करता येत नाही. सरकारच्या अशा कृतीमुळे उभ्या देशामध्ये महाराष्ट्राची बदनामी होती. काल परवा पर्यंत जे  बांधकाम त्याच ठिकाणी होते  पण कारवाई केली जात नव्हती.अचानक कोणी तरी बोलल्या मुले ते बांधकाम अवैध  आहे म्हणून कारवाई केली जाते .मग मुंबईतल्या इतर अवैध बांधकामावर सरकार कारवाई का करत नाही त्यामुळे केवळ बदल्याच्या भावनेने केलेली कारवाई हि खर्या अर्थाने महाराष्ट्राला शोभणारी नाही.राज्यकर्त्यांना शोभणारी महाराष्ट्रात एक प्रकारे सरकार पुरस्कृत चालली आहे.” अशी टीका देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis}यांनी  केली

हेही वाचा :कोण आहे Babur and his army,कंगणाच्या घरावर हातोडा

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close