क्राईमताज्या घडामोडी

*बीड जिल्हा बँकेचे शिरूर शाखेचे तीन कर्मचारी Acb च्या जाळयात*

शेअर करा

 

 

शिरुर दि 2 जुलै टीमसीएम न्यूज

शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याची घटना आज दुपारी सव्वाचार च्या दरम्यान घडली आहे.तालुक्यातील आनंदगाव येथील एका शेतकऱ्याचे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान बँकेत त्याच्या खात्यावर जमा झाले होते.सदरील रक्कम खात्यातून काढून देण्यासाठी त्यांनी खातेदाराला आठ हजार रुपयांची मागणी केली होती.त्यानुसार आरोपी राजेंद्र कारभारी गुजर शिपाई,बाळु वामन जायभाये लिपिक,उद्धव विश्वनाथ जायभाये शाखाधिकारी यांच्या विरुद्ध तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भात तक्रार दाखल केली होती.आज दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी,पोलीस नाईक अमोल बागलाने,सखाराम घोलप,विजय बरकडे,गणेश मेहत्रे यांनी केली आहे.

*कारवाईची हॅटट्रिक*

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहरातील तीन शासकीय कार्यालयात सापळा रचून कारवाई केली आहे.सुरुवातीला संस्था निबंधक कार्यालयात तीन कर्मचारी नंतर पोलीस ठाण्याचे तीन पोलीस शिपाई आणि आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील तीन कर्मचारी या विभागाच्या जाळ्यात अडकले असल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईची हॅटट्रिक केली आहे.

*कर्मचाऱ्यांच्या पापाचा घडा भरला होता*

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कसल्याही प्रकारची कार्यालयीन शिस्त राहिली नव्हती.बँकेचे मुजोर कर्मचारी ज्येष्ठ नागरिकांना आणि खातेदारांना वागणूक देत असायचे.आपणच या बँकेचे मालक असल्याच्या अविर्भावात वागत होते.मनमानीपणे कारभार करत असायचे.आम्ही काहीही केले तरी आमचे कोणीच काही करू शकत नाही अशा पध्दतीने त्यांची वागणूक असायची.लाभार्थ्याला पैसे लवकर मिळवून देतो असे म्हणत त्याची आर्थिक लुबाडणूक करायची असे अनेक प्रकार या बँकेत पहायला मिळायचे.आज या सर्व गोष्टींचा अतिरेक झालेला पहायला मिळाला आणि या लोकांच्या पापाचा घडा भरल्याच्या प्रतिक्रिया बँके बाहेर उभे असलेले लोक देत होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close