निर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये
निर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये

नगर/बीड दि 5 जून

राज्यातील विविध जिल्ह्यातील टाळेबंदी उठविण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जाहीर केला आहे.विविध जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ही रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या आधारावर ही टाळेबंदी उठविली जाणार आहे.पहिल्या लेव्हल मध्ये अहमदनगर जिल्ह्याचा तर तिसऱ्या लेवल मध्ये बीडचा समावेश आहे.
हा निर्णय समावेश लागू असणार आहे.
तर दर आठवड्याला हे निर्णय कोरोना स्थितीनुसार बदलणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट हा 4.30 इतका आहे.ऑक्सिजन बेडची उपलब्धता 24.48 इतकी आहे.त्यामुळे अहमदनगर चा समावेश लेव्हल एक मध्ये झाला आहे.

बीड जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 8.40इतका आहे.तर ऑक्सिजन बेडची उपलब्धता 47.14 इतकी आहे.त्यामुळे बीडचा समावेश तिसऱ्या लेव्हल मध्ये झाला आहे.मात्र दर आठवड्याला हे चित्र बदलणार आहे.

राज्यातील स्तरनिहाय अनलॉक बाबतचा निर्णय घोषित करण्यात आला. कोरोना पोझिटिव्ही रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. यात पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या आणि २५ टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन बेड व्यापले आहेत असे जिल्हे निर्बंधमुक्त राहणार आहेत. तर ५ टक्के पॉझिटिव्हिटी दर व २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, दर गुरुवारी निश्चित निकषानुसार स्थिती आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात येणार असून त्याआधारावर कुठे निर्बंध कमी करायचे आणि कुठे वाढवायचे याबाबतचा नवा आदेश लागू केला जाणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच सोमवारपासून होईल, असे नमूद करण्यात आले आहे.
पहिल्या लेव्हल मध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के आणि २५ टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असतील असे जिल्हे.या भागात सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होणार. मॉल, थीएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहेसुद्धा नियमितपणे सुरू. रेस्टॉरंटसाठीही परवानगी. लॉकल सेवा पूर्ववत होईल मात्र स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागास निर्बंध घालण्याची मुभा असेल. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा. शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील. विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल. लग्न सोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतेही बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत असेल. या भागात जमावबंदीही नसेल.

तिसरा स्तर: पॉझिटिव्हिटी दर ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापले आहेत असे जिल्हे स्तर क्रमांक ३ मध्ये सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व अत्यावश्यक दुकाने खुली ठेवण्यास मुभा असेल. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरू तर वीकेंडला बंद राहतील. स्तर क्र. ४ मध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने चार वाजेपर्यंत सुरू राहतील तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने पूर्णपणे बंद राहतील. स्तर क्र. ५ मध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरू राहतील तर वीकेंडला मेडिकल सोडून बाकी सर्व दुकाने बंद राहतील. ३, ४ आणि ५ या स्तरांतील भागात इतरही अनेक निर्बंध कायम राहणार आहेत

जमाव बंदी कायम असणार आहे.

Share this story