मढी ते मायंबा रोप वे च्या कामाला मंजुरी
मढी ते मायंबा रोप वे च्या कामाला मंजुरी

  अहमदनगर,प्रतिनिधी

मढी कानिफनाथ मंदिर ते मच्छिंद्रनाथ मंदिर मायंबा येथे रोप वे तयार करण्यास जिल्हा नियोजन विभागाच्या वार्षिक बैठकीत मंजुरी देण्यात आली.

त्यासाठी निधी मंजूर केला असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

          जिल्‍हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री श्री. हसन मुश्रीफ यांच्‍या अध्‍यक्षतेखाली  आयोजित करण्‍यात आली होती.

त्‍या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर नगरविकास राज्‍यमंत्री प्राजक्‍त तनपुरे,

जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा राजश्री घुले पाटील, खासदार स‍दाशिवराव लोखंडे, जिल्‍हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील उपस्थित होते.

जिल्ह्यातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

नाथ संप्रदायातील कानिफनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांचे स्थाने गर्भगिरी डोंगर रांगेत आहेत.

या भागात भाविकांचा मोठा वावर असतो. नाथ संप्रदायातील कानिफनाथ यांचे मढी येथे समाधी आहे

तर मच्छिंद्रनाथ यांची आष्टी तालुक्यातील मायंबा सावरगाव येथे आहे.

मढी रोप वे ने होणार सहज दर्शन 

दोन्ही स्थळामध्ये कमी अंतर असून डोंगरच्या वरचा बाजूला मच्छिंद्रनाथ यांची समाधी तर डोंगराच्या खाली कानिफनाथांची समाधी आहे.

या भागात आलेला नाथ भक्त दोन्ही नाथांचे दर्शन घेतल्याशिवाय जात नाही.

आणखी वाचा :अखेर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा निलंबित

कानिफनाथ मढी येथे मच्छिंद्रनाथ येथे जायचे असल्यास घाटाचा खडतर मार्ग आहे.

आता या ठिकाणी रोप वे झाल्यास भाविकांना दोन्ही नाथांच्या दर्शनाची सोय होईल.

तसेच धार्मिक पर्यटनास मोठ्या प्रमाणावर संधी मिळणार आहे.

जिल्ह्यातील पहिलेच धार्मिक रोप वे पर्यटन केंद्र यामुळे होण्यास मदत होणार आहे.

मढी, येथील कानिफनाथ, मायंबा येथील मच्छिंद्रनाथ आणि घाटशिरस येथील नाथांचे आद्य वृद्धेश्वर हे स्थळे एकमेकांना सलग्न आहेत.

भाविक या तिन्ही ठिकाणचे दर्शन घेण्यासाठी येतात.

जिल्‍ह्यात मौजे माका (नेवासा), मौजे तिळवणी (कोपरगाव) आणि मौजे को-हाळे (राहाता) या तीन ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्‍य केंद्र स्‍थापन करण्‍याच्‍या प्रस्‍तावास मान्‍यता देण्‍यात आली.

जिल्‍ह्यात श्री जगदंबा माता मंदिर देवस्‍थान, ब्राम्‍हणगांव (कोपरगाव), श्री विठ्ठल रुख्मिणी मंदीर देवस्‍थान,

मनोहरपूर (अकोले) व सदगुरू हरिहर सत्‍संग लिंगतीर्थ ट्रस्‍ट, इसळक (नगर) या ग्रामीण तीर्थक्षेत्रांना '' वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्‍यता देण्‍यात आली.

तसेच आजपर्यंत जे प्रस्‍ताव प्राप्‍त होतील ते प्रस्‍ताव मंजूर करण्‍याचा ठराव करण्‍यात आला.

कानिफनाथ देवस्‍थान ट्रस्‍ट, (मढी) व श्री क्षेत्र सावरगांव येथे रोप-वे उभारण्‍यासाठी निधी मंजूर करण्‍यात आला.

        या बैठकीला विधानपरिषद आमदार किशोर दराडे, आमदार संग्राम जगताप, मोनिकाताई राजळे,

रोहित पवार, लहु कानडे, आशुतोष काळे, निलेश लंके, किरण लहामटे तसेच जिल्‍हा परिषदेचे सदस्‍य व जिल्‍हा नियोजन

समितीचे सदस्‍य तसेच सर्व विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.  

Share this story