भाग....अविनाश...भाग,मांडव्याच्या अविनाशची टोक्यो ऑलम्पिक भरारी
टोकियो ऑलम्पिक

मनोज सातपुते

सन 1964 ची गोष्ट, याच टोकियो ऑलम्पिक मध्ये भारताचा एक फ्लाइंग मॅन धावत होता. मात्र त्याला या ऑलम्पिक मध्ये पदक मिळवता आले नाही. पदकाची संधी हुकली. तेंव्हा पासून ते आज पर्यंत भारताला अथेलेट मध्ये पदक मिळवता आले नाही. या बाबतची हुरहूर आजही भारतीयांच्या  मनात आहे.त्याच दमाचा आणि जोशाचा धावपटू ऑलम्पिकच्या मैदानावर उतरला आहे. 52 वर्षानंतर भारताला अविनाश साबळे याच्या रूपाने पदकाची आशा आहे.

टोकियो ऑलम्पिक

सन 2006, मांडवा गावातील मंदिराच्या पारावर छोट्याश्या धावपटूचा शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी गौरव केला होता. त्यावेळी  गावकर्यांनाही वाटले नव्हते कि, हा धावपटू थेट टोकियो ऑलम्पिक पर्यंत पोहचेल.मात्र हेच त्याचे गुण हेरून त्याला धानोरा येथील स्वयंसेवी संस्थेच्या धावण्याच्या स्पर्धेत उतरवले आणि तो अवघ्या चौथीत असताना एक किलोमीटरच्या स्पर्धेत पहिला आला. तो अविनाशचा पहिला सत्कार..तेथून पुढे अविनाश सत्काराची माळच तो तयार करत गेला.

 भाग... अविनाश भाग...असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारणही तसेच आहे 52 वर्षानंतर प्रथमच धावण्याच्या  स्टीपलचेस स्पर्धेत  अविनाश साबळे भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. गेल्या ६० ते ६५ वर्षात एकाही धावपटूला पदकापर्यंत जाता आले नाही मात्र अविनाशच्या खांद्यावर हि मोठी जबाबदारी पडली आहे. 

कोण आहे अविनाश साबळे. कसा पोहचला अविनाश थेट ऑलिम्पिक पर्यंत त्याच्या कर्तृत्वाची यशोगाथा.

अविनाशच्या धावण्याचा सराव त्याच्या घरापासून म्हणजेच शेरी गावच्या वीटभट्टीपासून सुरु झाला.2006 मध्ये त्याचे आई वडील जवळच्या शेरी गावातील वीटभट्टीवर कामाला गेले. अविनाशही त्यांच्याबरोबर होता.वडील काम करायचे आणि अविनाश सकाळीच उठून मांडव्याच्या जिल्हा परिषद शाळेत धावायचा..हे 5-6 किमीचे अंतर तो सहज धावून जायचा. सर्वांच्या आधी तो शाळेत पोहचायचा. अविनाशचे चौथीचे शिक्षक बाबासाहेब तावरे यांनी सांगितले.

      लहानपणीच अविनाशचे पाय पाळण्यात दिसत होते.त्याच्या धावण्याला प्रचंड वेग होता.याच त्याच्या धावण्याच्या जिद्दीने त्याला थेट ऑलम्पिक पर्यंत पोहचवलय.आता प्रतीक्षा आहे फक्त जिंकण्याची.

avinash sable

अविनाशला  आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीव असल्याने त्याने आर्मीत जाण्याचा निर्णय घेतला.कडा येथील पी एम मुनोत कनिष्ठ महाविद्यालयात ११ वी – १२ वीचे शिक्षण केल्यानतर तो आर्मीत भरती झाला.या दोन वर्षात त्याने ५००० मीटर स्पर्धेत भाग घेऊन राष्ट्रीय रेकोर्ड स्थापित केले होते. क्रीडा शिक्षक जमीर सय्यद हे त्याचे क्रीडा शिक्षक होते. त्यांनी अविनाशला प्रोत्साहन दिले.सध्या आर्मीत अमरीश कुमार हे त्याला मार्गदर्शन करत आहेत.

ऑलिम्पिक साठी आष्टीच्या अविनाश साबळेला राज्य शासनाची 50 लाखांची मदत

गेमचेंजर अविनाश बनणार ऑलम्पिक वीर

धावणे हा अविनाशचा जीव कि प्राण होता, तसा तो धावतच राहिला.अविनाशच्या ऑलम्पिक प्रवेशाने  अविनाशच्या आई वडिलांना आनंद झाला आहे. गावापासून काही अंतरावर धनगर वस्ती आहे तिथे साबळे कुटुंब राहते. या वस्तीपर्यंत जायला चांगला रस्ता पण नाही. अशा स्थितीत अविनाशने आपले शिक्षण घेत ऑलम्पिक पर्यंत मजल मारली आहे. अविनाशने देशासाठी ऑलम्पिक मध्ये पदक घेऊन यावे हीच आई वडिलांची अपेक्षा आहे.

लहानपणापासून बंदूक आणि धावायला खूप आवडत असे. त्यामुळे तो आर्मीत भरती झाला आणि तिथेही धावू लागला. अविनाशच्या आई वैशाली साबळे यांनी  बोलताना सांगितले.

avinash sable

विनाशने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे तो ऑलम्पिक पर्यंत पोहचला आहे आता त्याच्या पदकाची सर्वाना आशा लागली आहे.  गावातील नागरिकही स्पर्धेकडे डोळे लावून आहेत.अविनाशच्या पदकाने जिल्ह्याची देशात मान उंचावणार आहे. तो देशाचा अभिमान सार्थ ठरवेल. अविनाशला खूप खूप ऑलम्पिक शुभेच्छा.

Share this story