*अहमदनगर जिल्ह्यात ५२२ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज तर वाढले ६५० नवे रुग्ण*
*अहमदनगर जिल्ह्यात ५२२ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज तर वाढले ६५० नवे रुग्ण*

 

अहमदनगर दि 19 प्रतिनिधी

जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ११,६४७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७८.०८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६५० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३,०७९ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ११९, अँटीजेन चाचणीत ३१४ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २१७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७९ पाथर्डी ०३, नगर ग्रा. १७, कॅन्टोन्मेंट ०५, नेवासा ०१, श्रीगोंदा ०४, पारनेर ०३, शेवगाव ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३१४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ५४, संगमनेर १७, राहाता २२, पाथर्डी ११, नगर ग्रामीण ६०,
श्रीरामपुर २९, कॅंटोन्मेंट ०८, नेवासा ०७, श्रीगोंदा १६, पारनेर १३, राहुरी ०७, शेवगाव ०७,
कोपरगाव २२, जामखेड २८ आणि कर्जत १३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २१७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १३१, संगमनेर १४, राहाता ०८, पाथर्डी ०३,
नगर ग्रामीण २०, श्रीरामपुर ०८, कॅंटोन्मेंट ०५, नेवासा ०४, पारनेर १६,अकोले ०३, राहुरी ०४, जामखेड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

वाचा:पाथर्डीत 23 कोरोना बाधित;पोलीस ठाण्यातील एक कर्मचाऱ्यासह एक आरोपी बाधित

दरम्यान, आज एकूण ५२२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. मनपा १५९, संगमनेर ३८, राहाता २६, पाथर्डी २९, नगर ग्रा.४८, श्रीरामपूर १४, कॅन्टोन्मेंट ०८, नेवासा २५, श्रीगोंदा १५, पारनेर २७, अकोले ०७, राहुरी १४, शेवगाव ३५,
कोपरगाव १५, जामखेड २६, कर्जत ३५ मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या: ११६४७*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:३०७९*

*मृत्यू :१९१*

*एकूण रूग्ण संख्या:१४९१७*

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

Share this story