*अहमदनगर जिल्ह्यात ९९ कोरोना corona बाधितांची रुग्णसंख्येत भर;८३४ रुग्णांना डिस्चार्ज*
*अहमदनगर जिल्ह्यात ९९ कोरोना corona बाधितांची रुग्णसंख्येत भर;८३४ रुग्णांना डिस्चार्ज*

 

अहमदनगर दि.२९ सप्टेंबर, प्रतिनिधी

अहमदनगर  जिल्ह्यात आज तब्बल ८३४ कोरोना coronaरुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ३६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.०१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत कोरोना corona ९९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ इतकी झाली आहे.

 

बाधीत आढळून आलेल्या  कोरोना corona रुग्णामध्ये मनपा २२, कोपरगाव ०१,  नगर ग्रामीण १०, नेवासा ०१, पारनेर १०, पाथर्डी १०, शेवगाव ०८, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर १५ आणि मिलिटरी हॉस्पिटल १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा :टीका झाल्यानंतर स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची प्रक्रिया

दरम्यान, आज ८३४ कोरोना corona रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये  मनपा १७५, अकोले ३६, जामखेड ४१, कर्जत ३१,  कोपरगाव ४४, नगर ग्रामीण ८७, नेवासा ३०, पारनेर ४०, पाथर्डी ६३, राहाता ६५, राहुरी ५६, संगमनेर ५३, शेवगाव २३, श्रीगोंदा ३७, श्रीरामपूर २६, कॅंटोन्मेंट १३, मिलिटरी हॉस्पिटल १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:३८३६५

उपचार सुरू असलेले रूग्ण:४०३९

मृत्यू:६९८

एकूण रूग्ण संख्या:४३१०२

 

Share this story