*राज्यात भाजपा माझं आंगण रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलन 22 ला करणार*
*राज्यात भाजपा माझं आंगण रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलन 22 ला करणार*

 

मुंबई दि 20, टीम सीएमन्यूज

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे. आता आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून शुक्रवार, दि. २२ रोजी राज्यभर पक्षाचे लाखो कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक सरकारच्या कामाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपल्या घराबाहेर फलक घेऊन निदर्शने करतील.यासंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष
आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी ही माहिती दिली.
9 मार्च ला राज्यात आणि केरळात एकाच वेळी कोरोना बाधित रुग्ण आढळला.गेल्या 70 दिवसात राज्याची संख्या 40 हजार वर गेली मात्र केरळ 1000 च्या पण पुढे नाही. केरळात12 मृत्यू झाले मात्र राज्यात 1300 च्या वर संख्या गेली असून सरकार अपयशी ठरले आहे . राज्य सरकारने सामान्य जनतेला पॅकेज जाहीर करण्याची आवश्यकता असून ते अद्याप घोषित नाही.याचा निषेध म्हणून राज्यातील जनता सामाजिक अंतर ठेवून 22 मे रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत काळ्या फिती, ओढणी,शर्ट,यांचा वापर करून घरासमोर
माझं आंगण रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलन
करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .

Share this story