*पाथर्डीत आज 25 कोरोना पॉझिटिव्हची भर*
*पाथर्डीत आज 25 कोरोना पॉझिटिव्हची भर*

पाथर्डी दि 31 जुलै टीमसीएम न्यूज

आज दिवसभरात 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये कृषी कार्यालयातील एका कर्मचाऱ्यासह त्याच्या मुलाचा समावेश आहे.तर शहरातील एक मोबाईल दुकानदार तसेच डोंगरवाडी येथील कांदा व्यावसायिकाला कोरोना झाल्याने खळबळ उडाली आहे.

दुपारी 1:50 वाजता शहर आणि तालुक्यातील रंगार गल्ली 02, भालगाव 04,वामनभाऊ नगर 01,हरिजनवस्ती 03,आखार भाग 02,आनंद नगर 02,माळेगाव 02,पागोरी पिंपळगाव 01 या भागातील 17 कोरोना बाधित व्यक्ती आहेत तर सायं.6:15 वाजता शहर आणि तालुक्यातील नाथनगर 02,कासार गल्ली 01,डोंगरवाडी 01,पागोरी पिंपळगाव 01,माळेगाव 02,जुने बसस्टँड 01 याभागातील 8 सर्व कोरोना बाधित आहेत असे एकूण दिवसभरात 25 रुग्ण कोरोनाने बाधित झाले आहे

तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे,कोव्हीड सेंटरचे प्रमुख डॉ महेंद्र बांगर,डॉ सुदर्शन बडे,डॉ मनोज केदार, डॉ शिवराज केदार, डॉ अतुल खेडकर, डॉ गणेश मुळीक यांच्या पथकाने आज 103 जणांची रॅपिड अँटीजन चाचणी केली. त्यात 25 व्यक्ती कोरोना विषाणूने बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

कृषी कार्यालयातील बाधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेले कृषी खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Share this story