कार्तिकी एकादशी निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा
कार्तिकी एकादशी निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा

 

 

पंढरपूर दि 26 प्रतिनिधी

कार्तिकी एकादशी निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक महापूजा करण्यात आली.यावेळी त्यांनी जगावर देशावरचे कोरोनाचे संकट आहे, ते संकट दूर होऊ दे. कोरोनाची लवकर लस मिळू दे असे साकडे राज्यातील सर्व जनतेच्या वतीने विठ्ठलाला घातले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी मानाचे वारकरी कवडुजी भोयर, कुसुमबाई भोयर, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सारिका भरणे उपस्थित होते.

कोणामुळे लोक डाऊन पडले आहे. त्यामुळे शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर छोटे-छोटे कामगार, हातावरचे पोट असणारे लोक यांनादेखील काम करता येत नाही. यामुळे त्यांचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न गंभीर होत आहेत. ही परिस्थिती लवकर बदलू दे. कोरोनाचे संकट दूर होऊ दे.

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बळ मिळू दे, असे साकडे पांडुरंगाकडे घातले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

वेगळे वळण देणाऱ्याला वारकरी संप्रदायाने दिली नाही साथ

वारकर्‍यांची संबंध महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल आहे. त्यामुळे सर्वांना विठ्ठलाच्या दर्शनाची आतुर झालेले असतात. जरी कोरोनाचे संकट असले तरी चर्चेतून चांगल्या पद्धतीचा मार्ग काढण्याचे प्रयत्न करायचा असतो. कोणी याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला तरी वारकरी संप्रदायाने त्याला साथ दिली नसल्याचे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा:हत्या करून बिबट्या मोकाट; गाव अजूनही बिबट्याच्या दहशती खाली

 

Share this story