*साश्रु नयनांनी शहिद सचिन मोरे यांना अखेरचा निरोप*
*साश्रु नयनांनी शहिद सचिन मोरे यांना अखेरचा निरोप*

 

साकुरी,नाशिक दि 27 टीमसीएम न्यूज

शहिद सचिन मोरे ‘अमर रहे’ भारत माता की जय घोषणा आणि साश्रुनयनांनी या वीरपुत्रांला अखेरचा निरोप देण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील साकुरी येथे शहीद सचिन यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले .
सकाळी शहीद सचिन मोरे यांचे पार्थिव पुणे येथून आज सकाळी नाशिक ,मालेगाव आणि साकुरी येथे आणण्यात आले.सकाळपासून साकुरी येथे शहीद सचिन यांच्या अंत्यसंस्कारासाठी जनसागर लोटला होता.

इंजिनिअर असलेले शहीद जवान सचिन मोरे हे गलवान खोऱ्यात पुलाचे काम सुरु असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले . साकुरी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले .यावेळी त्यांच्या पत्नी सह कुटुंबीयांनी अंतिम दर्शन घेतले.
यावेळी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, माजी संरक्षण राज्यमंत्री मंत्री तथा खासदार सुभाष भामरे, कृषी मंत्री दादा भुसे यांनी श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

 

*साश्रु नयनांनी शहिद सचिन मोरे यांना अखेरचा निरोप*

Share this story