नरभक्षक बिबट्याचा करमाळा तालुक्यात दुसरा  बळी;महिला ठार
नरभक्षक बिबट्याचा करमाळा तालुक्यात दुसरा  बळी;महिला ठार

नरभक्षक बिबट्याचा करमाळा तालुक्यात दुसरा  बळी;महिला ठार

करमाळा दि 5  डिसेंबर, प्रतिनिधी

नरभक्षक बिबट्याने आष्टी तालुका सोडल्यानंतर करमाळा तालुक्यात भक्ष करायला सुरूवात केली.फुंदेवाडी नंतर आज अंजनडोह मध्ये महिलेवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना सायंकाळी पावणे सात वाजता घडली.

आष्टी तालुक्यात तीन बळी घेतल्यानंतर बिबट्याने आपला मोर्चा करमाळा तालुक्यात वळवला .तिथे त्याने फुंदेवाडीत शेतात काम करणाऱ्या व्यक्तीला ठार केल्यानंतर आज पुन्हा अंजनडोह येथील महिला जयश्री शिंदे यांच्यावर हल्ला केला आणि ठार केले .या नरभक्षक बिबट्याची ठार मारण्याची पद्धत एकच असल्याने तो मानेवर हल्ला करून रक्त पिऊन ठार करतो .यापूर्वीच्या सर्व घटना याच पद्धतीने केलेल्या आहेत.आष्टी तालुक्यातील वन विभागाने या बिबट्याला ठार मारण्याचा प्रस्ताव वन्य जीव विभागाकडे पाठविला आहे.
सर्व नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा:तीन तालुक्यात कोरोना शून्य ; जिल्ह्यात 28 कोरोना बाधित

Share this story