*टाळेबंदीच्या काळात मदत;हॉटेल सुवर्णम प्राईडचे महेश धुमाळ सन्मानित*
*टाळेबंदीच्या काळात मदत;हॉटेल सुवर्णम प्राईडचे महेश धुमाळ सन्मानित*

 

अहमदनगर दि 16 जून ,टीमसीएम न्यूज

टाळे बंदीच्या काळात गरजू लोकांना होटेल सुवर्णम प्राइड च्या माध्यमातून 35 हजार जेवणाचे डबे पुरवून कोविड 19 मध्ये सेवा दिल्याबद्दल जिल्हा पोलिस विभागाने हॉटेलचे संचालक महेश धुमाळ यांना मानपत्र देऊन सन्मानित केले आहे.

टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर 23 मार्च पासून हॉटेल सुवर्णम प्राईड हॉटेलच्या माध्यमातून महेश धुमाळ यांनी शहरातील गरजू नागरिकांपर्यंत जेवण पोहचविण्यासाठी प्रयत्न केले.त्यानंतर त्यांना पोलीस विभागाच्या मदतीने आणि संचारबंदी असताना हॉटेल कर्मचाऱ्यांच्या
घरघर लंगर ग्रुपच्या मदतीने रामवाडी, झोपडपटटी, सिविल हॉस्पिटल, सिद्धार्थ नगर, झोपडपट्टी ,भिंगार परिसरात जेवणाच्या डब्याचे वाटप केले.महेश धुमाळ दीड महिना घर सोडून हॉटेलमध्येच राहिले पहाटे चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत यांनी स्वतः गरजूंना घरपोच डबा देण्याचे कार्य केले .
या अन्नछत्रातुन टाळेबंदी च्या काळात 35000 जेवणाच्या डब्यांची मोफत वितरण करण्यात आले.या अन्नक्षेत्रा चा संपूर्ण खर्च धुमाळ यांनी केला.
त्यांच्या या दानशूर कार्याबद्दल त्यांना जिल्हा पोलीस विभागाने सन्मानित करण्यात आले .जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या हस्ते हे सन्मानपत्र देण्यात आले . नवनाथ धुमाळ यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ तारकपूर परिसरातील हॉटेलमधील पेशंट आणि नातेवाईकांसाठी मागील दीड वर्षापासून अन्नछत्र चालवले जात आहे.

Share this story