*टीका झाल्यानंतर स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची प्रक्रिया*
*टीका झाल्यानंतर स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची प्रक्रिया*

 

 

मुंबई दि. २९,सप्टेंबर प्रतिनिधी

उसतोडणी कामगारांसाठी सुरु लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कुठे आहे यासंदर्भात टीका होऊ लागल्याने बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या महामंडळाची आज तातडीने बैठक घेऊन कामगारांची नोंदणी करण्याचे निर्देश दिले.

बीड जिल्ह्यातील बहुतांश मजूर हा उसतोडणी करण्यासाठी राज्यातील आणि पर राज्यातील साखर कारखान्यांवर उस तोडणी साठी दरवर्षी जातो. या उस तोडणी कामगारांच्या कल्याणासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्यात आले होते. दरवर्षी या महामंडळाच्या नावाने बोंब ठोकली जाते. हे महामंडळाचे कार्यालय परळी येथे असले तरी प्रत्यक्षात येथे काहीही नाही.या महामंडळाची घोषणा झाली. मात्र प्रत्यक्षात काम काहीही नाही.उसतोड कामगारांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर या महामंडळाचे राजकारण होत असल्याने आज सामजिक न्याय मंत्री धनजंय मुंडे यांनी या महामंडळाच्या संदर्भात निर्देश दिले.

मांजरसुम्बा येथे आयोजित उसतोडणी कामगार बैठकीत शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी पालकमंत्री धनजंय मुंडे यांना आव्हान दिले होते.

 

हेही वाचा :उसतोडणी मजूर संपात संघटनांना हवी मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी 

आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत या महामंडळाची रचना, घटना इत्यादी आकृतिबंध तयार करून महामंडळ कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कारवाई करावी. प्राथमिक स्तरावर ऊसतोड कामगारांची नोंदणी करणे आवश्यक असून, नोंदणीची प्रक्रिया येत्या काही दिवसातच सुरू करण्यात यावी यासाठी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

यासंबंधीची महत्वपूर्ण बैठक ना. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाली. या बैठकीस आ. संजय दौंड, सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव श्याम तागडे, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टी चे महासंचालक धम्मजित गजभिये, ग्रामविकास विभागाचे उपसचिव श्री. जोशी, कामगार विभागाचे उपसचिव, सहकार विभागाचे उपसचिव श्री. घाडगे, साखर आयुक्तालयाचे संचालक श्री. उत्तम इंदलकर, यांसह विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Share this story