मुंबईतील शाळा बंद
मुंबईतील शाळा बंद

मुंबईतील शाळा बंद

ओमिक्रोन चा वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इयत्ता 1 ते 9 वी पर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत

बंद राहणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सोमवारी हा आदेश जारी केला. मात्र इयत्ता

10वी आणि 12वीसाठी शाळा सुरू राहतील.तसेच ऑनलाईन शिक्षण सुरु असणार आहे.

राज्यातील कोरोना संख्या पाहता आणि मुंबईतील कोरोना वाढीचे प्रमाण अधिक असल्याने मुंबईतील

शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला . इयत्ता 1 ते 8 च्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा सुरू केलेल्या

शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता 9 वी किंवा त्यावरील

विद्यार्थी केवळ लसीकरणाच्या उद्देशाने शाळेत जाऊ शकतात. देशात सोमवारपासून १५ ते १८

वयोगटातील विद्यार्थ्यांचे  लसीकरण सुरू केले आहे.

आज 79 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 47 बाधितांची रुग्ण संख्येत भर

Share this story